आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन:सामाजिक स्वातंत्र्यासाठी मनाची तयारी हवी; वैचारिक मंथन हवे

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याेत्तर काळातही सामाजिक प्रश्न तसेच उभे आहेत. याचाच अर्थ सामाजिक स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यासाठी मनाची तयारी लागते आणि वैचारिक मंथनही, असे स्पष्ट विचार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. डाॅ. नभा काकडे यांनी येथे मांडले.फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. अंजना गायकवाड लिखित ‘सांग लाडके तुझी जात काेणती?’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी झाले.

डाॅ. काकडे यांच्या हस्ते हा साेहळा झाला. त्या वेळी त्या बाेलत हाेत्या. प्राचार्य मीना गायकवाड अध्यक्षस्थानी हाेत्या. ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, लेखिका प्रा. डाॅ. नसीम पठाण यांची प्रमुख उपस्थिती हाेती. डाॅ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या साेहळ्यासाठी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित हाेती. प्रा. धम्मपाल माशाळकर यांनी प्रास्ताविक केले.

हम आपके है काेन मुळेरूढी, परंपरा घट्ट झाल्या
हम आपके है काेन? या सिनेमाने रूढी, परंपरा अधिक घट्ट केल्या आहेत. त्यांचे प्राबल्य कमी करण्याचे आव्हान साहित्यिकांचे आहे. प्रा. गायकवाड यांनी सामाजिक आशयाचे बीज पेरलेच आहे. त्यांनी पेरतेच व्हावे, जाते फिरवतच राहावे. ज्या वेळी ते थांबेल, त्याच वेळी सामाजिक परिवर्तन घडून येईल.
प्रा. डाॅ. नभा काकडे, इतिहास अभ्यासक

पाणी पिला म्हणून दलित मुलाला शिक्षकाने मारले
स्वातंत्र्याचा अमृतमहाेत्सव असताना राजस्थानात एक भयंकर घटना घडली. दलित मुलाने शिक्षकाच्या माठातील पाणी प्याला म्हणून त्याला इतके मारले की त्याचा जीवच गेला. दलित समूहातील दाेन लाख जणांवर दरवर्षी अत्याचार हाेताे. ही सरकारी आकडेवार आहे.
नरसय्या आडम, कामगार नेते

बातम्या आणखी आहेत...