आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकथेत सावित्रीने यमदेवाकडून पतीचे प्राण परत मिळवले होते. यानिमित्त ज्येष्ठ पौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी तिची आठवण काढत वडाची पूजा बांधण्यात येते. २१ व्या शतकातील आधुनिक सावित्रीने स्वत:चे मूत्रपिंड पतीला देऊन मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले आहे. दोघेही ठणठणीत असून दैनंदिन जीवन आनंदात जगत आहेत. पीडब्ल्यूडी वसाहतीमध्ये राहणाऱ्या व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोदिनी हिरळीकर यांच्याशी वटपौर्णिमानिमित्त ‘दिव्य मराठी’ ने संवाद साधला. प्रमोदिनी हिरळीकर व संजय हिरळीकर यांचा विवाह डिसेंबर १९८८ मध्ये झाला. दोघांचाही सुखी संसार व्यवस्थित सुरू होता. दहा वर्षानंतर सुखी संसारास नजर लागली, पती संजय हिरळीकर (सध्याचे वय ५१) यांना मुतखड्यांचा त्रास सन २००८ पासून सुरू झाला. डाव्या मूत्रपिंडमध्ये ३ वेळा मुतखड्याची शस्त्रक्रिया झाल्या. दवाखाना कमी न होता तो वाढतच गेला. कालांतराने दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १ डिसेंबर २०१७ पासून डायलिसिस सुरू केले. यशोधरा हॉस्पिटलमध्ये डॉ. निलरोहित पैकी यांच्या नेतृत्वाखाली आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस केले जात हाेते. डायलिसिस बंद करण्यासाठी डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा उपाय सांगितला. त्या गोष्टीचा विचार करून प्रमोदिनी हिरळीकर यांनी स्वत: मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून प्रत्यारोपण करण्यासाठी कायदेशीररीत्या सर्व प्रक्रिया पूर्ण केली. ११ ऑक्टोबर २०१९ साली मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. पती व पत्नीची तब्येतही ठणठणीत आहे.
यांच्या नेतृत्वाखाली आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस केले जात होते. डायलिसिस बंद करण्यासाठी डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा उपाय सांगितला. त्या गोष्टीचा विचार करून प्रमोदिनी हिरळीकर यांनी स्वत: मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून प्रत्यारोपण करण्यासाठी कायदेशीररीत्या सर्व प्रक्रिया पूर्ण केली. ११ ऑक्टोबर २०१९ साली मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. पती व पत्नीची तब्येतही ठणठणीत आहे.
पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नव्हता. माझे दोन्ही मूत्रपिंड घेऊन आयुष्यभर मिरवत राहण्यापेक्षा एक मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. देवकृपेने माझी मूत्रपिंडही जुळत असल्याने क्षणाचा विचार न करता लगेच दान करण्यास तयार झाले. कारण डायलिसिसवर असलेल्या व्यक्तीला काय त्रास होतो, याची जाणीव मला माहीत होते. त्यानंतर मार्च २०२० पासून कोविड सुरू झाला होता. तत्पूर्वी ऑक्टोबर २०१९ला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. माझी व पतीचीही तब्येत चांगली आहे, असे प्रमोदिनी हिरळीकर यांनी सांगितले.
राहणाऱ्या व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोदिनी हिरळीकर यांच्याशी वटपौर्णिमानिमित्त ‘दिव्य मराठी’ ने संवाद साधला. प्रमोदिनी हिरळीकर व संजय हिरळीकर यांचा विवाह डिसेंबर १९८८ मध्ये झाला. दोघांचाही सुखी संसार व्यवस्थित सुरू होता. दहा वर्षानंतर सुखी संसारास नजर लागली, पती संजय हिरळीकर (सध्याचे वय ५१) यांना मुतखड्यांचा त्रास सन २००८ पासून सुरू झाला. डाव्या मूत्रपिंडमध्ये ३ वेळा मुतखड्याची शस्त्रक्रिया झाल्या. दवाखाना कमी न होता तो वाढतच गेला. कालांतराने दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १ डिसेंबर २०१७ पासून डायलिसिस सुरू केले. यशोधरा हॉस्पिटलमध्ये डॉ. निलरोहित पैकी दोघांचे एका मूत्रपिंडावर काम भागत आहे, आम्हा दोघांची तब्येत चांगली आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.