आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Modi Government At The Center Has Brought 'bad Days' By Raising Fuel Prices And Inflation; Protests Against The Central Government In All The Three Assembly Constituencies |marathi News

आंदोलन:केंद्रातील मोदी सरकारने इंधन दर, महागाई वाढवून ‘बुरे दिन’ आणले; तिन्ही विधानसभा मतदारसंघांत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने लागू केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे सोमवारी (दि. ४) शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत महागाईमुक्त भारत आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसतर्फे राज्यभरात सर्वत्र इंधन दरवाढ, वाढत्या महागाईच्या निषेधार्थ महागाईमुक्त भारत आंदोलन करण्यात आले. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातर्फे विजापूर रस्त्यावरील इंचगेरी मठासमोर आंदोलन झाले. दक्षिण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे, रोहित बिराजदार यांनी नेतृत्व केले. युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुमित भोसले यांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या काळात ६५ रुपये प्रतिलिटर पेट्रोल असताना स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्या पाठवल्या होत्या. सध्या पेट्रोल ११७ रुपये प्रतिलिटर झाले असून, भाजप समर्थक मूग गिळून गप्प आहेत. आज फक्त निषेध आंदोलन होते. देशाला महागाईतून मुक्त करायचे असेल तर मोदी सरकारला घरी बसवावे लागेल, असे भोसले म्हणाले. या वेळी दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीश पाटील, सुरेश हसापुरे, शिव कलशेट्टी, अनंत म्हेत्रे, रोहित बिराजदार, गेनसिद्ध भोरगुंडे, भुताळे कळकिळे, मल्लिनाथ कराशेट्टी, वीरेश कारंजे, विलास छपेकर, हनमू चांगले, सिद्धाराम चांगले, बाळू काळकिळे. सागर कारंजे, आकाश गायकवाड, धोंडराज रेड्डी, रोहित चाबुकस्वार, महेश रेड्डी, वीरेश रेड्डी, उमेश कुंभार, शाहरुख शेख, विकास चाबुकस्वार, दौलप्पा चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे कार्याध्यक्ष सिद्धाराम आनंदकर यांच्या वतीने तुळजापूर नाका येथे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खाद्य तेलाची दरवाढ करणाऱ्या, महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकार विरोधात निदर्शने केली.

शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, “मोदी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असूनही मोदी सरकार कर वाढवून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढवून जनतेचा खिसा रिकामा करत आहे.” या वेळी प्रदेश चिटणीस अॅड. मनीष गडदे, नगरसेवक विनोद भोसले, अरुण साठे, उदयशंकर चाकोते, सुनील रसाळे, केशव इंगळे, प्रवीण जाधव, तिरुपती परकीपंडला, दीनानाथ शेळके, सत्यनारायण संगा, रुकैय्याबानू बिराजदार, संजय गायकवाड, चंद्रकांत टिक्के यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

शहराध्यक्ष वाले म्हणाले, “मोदी सरकारच्या गलथान कारभारामुळे जनतेला तोंड द्याव्या लागणाऱ्या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने ‘महागाईमुक्त भारत’ हे आंदोलन सुरू केले आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाने निवडून आलेल्या मोदी सरकारमुळे जनतेचे बुरे दिन आले असून, मोदी सरकारने ताबडतोब दरवाढ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...