आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता न तू वैरिणी:पुन्हा मुलगीच झाली म्हणून अवघ्या 2 दिवसांच्या मुलीचा मातेनेच घोटला गळा; सांगलीच्या रुग्णालयातील घटनेने उडाली खळबळ

सांगली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाळाला वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल

अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३० रा. येळापूर जि. बेळगाव) या महिलेने पुन्हा मुलगीच झाली म्हणून अवघ्या दोन दिवसांच्या आपल्या मुलीचा गळा आवळून सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयातच हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

सांगलीच्या वसंतदादा शासकीय रूग्णालयात मन हेलावून टाकणारी ही घटना एका परिचारिकेमुळे उघडकीस आली. त्यानंतर रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर सुमित्रा जुट्टी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुमित्रा जुट्टी या कर्नाटक राज्यातल्या येळापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे माहेर सांगलीचे असल्याने तसेच घरची परिस्थितीतही अत्यंत हलाकीची असल्याने ही महिला बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. सासरचे कुटुंबीय मुलगी झाली म्हणून आपल्याला त्रास देतील, तसेच आपल्या कुटुंबीयांना वारस पाहिजे म्हणून आपल्याच दोन दिवसाच्या या मुलीचा गळा घोटला.

बाळाला वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल

परिचारिका या बाळाची व आईची तपासणी करण्यासाठी गेली असता मुलीच्या गळ्यावर व्रण आढळून आले. तसेच तिच्या गळ्यावर काळे डागही पडले होते. त्यानंतर तिने तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून या मुलीवर उपचार सुरू केले. मात्र, अवघ्या तासातच या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...