आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Municipal Corporation Demolished The House Saying Encroachment Without Providing Alternative Space, The Family On The Sidewalk For The Last Eight Days

चुल मांडून पालिकेचा निषेध:महापालिकेने पर्यायी जागा न देता अतिक्रमण म्हणत घर पाडले, गेल्या आठ दिवसापासून कुटुंब फुटपाथवर

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मड्डीवस्ती येथील सार्वजनिक जागेत वडिलोपार्जित काळापासून राहत असताना, महापालिकेने पर्यायी जागा न देता अतिक्रमण आहे, म्हणून झोपडी पाडली. त्यामुळे श्रावण यल्लप्पा चौगुले यांचे परिवार मागील आठ दिवसापासून मड्डीवस्ती परिसरात रस्त्यावर दिवस काढत आहेत.

पालिकेने पर्यायी जागा दिली नाही, त्यामुळे त्यांनी बुधवारी महापालिकेसमोर चुल मांडून स्वयंपाक केला. त्या परिवारास आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांनी मदत करत पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घालून देत निवेदन दिले. जुने पुरावे दिल्यास त्यांना पर्यायी जागा देऊ, असे आयुक्तांनी त्यांना सांगितले आहे.

चौगुले परिसरात रोडचे खडी फोडून उर्दरनिर्वाह करत असून मड्डीवस्ती परसरात खुल्या जागेत झोपडी घालून राहत होते. त्यांच्याकडे तेथील पत्याचे आधारकार्ड, मतदार कार्ड, पालिका कर पावती, लाईट बिल असताना त्यांना पर्यायी जागा न देता अतिक्रमणचे कारण देत झोपडी पाडली.

चुल मांडून स्वयंपाक करत पालिकेचा निषेध

लक्ष्मी विष्णू मिल येथील पालिकेची अर्धा एकर जागा अतिक्रमण करुन बळकवण्याचा प्रयत्न होत असताना त्यांना नोटीस देऊन काढू, असे आयुक्त सांगतात. मात्र, मजुरी करत दगड फोडणाऱ्या कुटुंबाचे शेडमात्र बळजबरीने काढले गेले. ते कुंटुब दोन लहान मुलासह आठ दिवसापासून फुटपाथवर जगत आहे. स्वयंपाकही तेथेच करतात. पालिकेने दाखल घेतली नाही, म्हणून बुधवारी गंगूबाई, उमाबाई, अर्चना, आरती, परशुराम, निकिता, श्रावण चौगुले यांनी पालिका गेट समोर चुल मांडून स्वयंपाक करत पालिकेचा निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...