आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Municipality Will Buy Junk, Scrap And Plastic Waste From Citizens; Waste Collection Centers Are Being Set Up In Four Parts Of The City| Marathi News

नवा प्रयोग:पालिका नागरिकांकडून विकत घेईल रद्दी , भंगार अन् प्लास्टिकचा कचरा; शहराच्या चार भागांमध्ये सुरू होताहेत भंगार संकलनाची केंद्रे

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कचरा संकलनाच्या क्षेत्रातील एक नवा प्रयोग राबवण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ही योजना म्हणजे रद्दी, भंगार आणि प्लास्टिकसारखा कचरा नागरिकांकडून विकत घेण्याची ही योजना आहे.शहरात रोज २५० ते ३०० टन कचरा संकलन होते. याशिवाय इतर कचरा निर्माण होतो.

त्यापैकी रद्दी, भंगार, प्लास्टिकसारखा कचरा महापालिका कचरा संकलन केंद्रांवर घेण्याचा प्रयोग महापालिका करणार आहे. रूपाभवानी मंदिराजवळील पालिका कचरा संकलन केंद्रावर हा प्रयोग सुरूही झाला आहे. बायोएनर्जी कंपनीने हा प्रयोग सुरू केला आहे. येथे नागरिक आपल्या घरातील भंगार व रद्दी महापालिकेला विकू शकतील. या योजनेत नागरिकांना गिफ्ट कूपन म्हणून डी मार्टसारख्या माॅलमधील खरेदी कूपनही देण्यात येतील.

शाळांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न
भविष्यात शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस भंगार घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. यासाठी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. विद्यार्थी किंवा पालक भंगार आणू देऊ शकतील, असे नियोजन आहे.

कचरा वर्गीकरण हा उद्देश
कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे या उद्देशाने महापालिका व बायोएनर्जी कंपनी यांच्या वतीने प्रयोग करून भंगार विकत घेण्यात येणार आहे. शहरातील चारही कचरा संकलन केंद्रांवर पुढील आठवड्यापासून भंगार विकत घेण्यात येणार आहे. तेथे गिफ्ट कूपनही देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी मदत करावे.
पी. शिवशंकर, पालिका आयुक्त

प्रयोगिक तत्त्वावर प्रत्येक केंद्रावर राेज एक टन कचरा संकलनाचे उद्दिष्ट आहे. आम्ही ते सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन पालिका आयुक्तांनी केले. बाजारभाव देण्याचा प्रयत्न असेल. बी. व्ही. कारंडे, सरव्यवस्थापक, बायोएनर्जी कंपनी

घंटागाडी चालकांना यापूर्वी भंगार विकायला नव्हती परवानगी
शहरात रोज २५० ते ३०० टन कचऱ्याचे संकलन होते. यात ४० टक्के ओला तर ६० टक्के सुका कचरा असतो. हा कचरा घंटागाडी चालक व मजूरमार्फत संकलित केला जातो. यातून लोखंड, प्लास्टीक वेगळे करून घंटागाडीवाले पालिका संकलन केंद्रावर विकू शकणार आहेत. यापूर्वी घंटागाडी चालकांना भंगार विकण्यास मनाई होती.

बातम्या आणखी आहेत...