आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचाच खून; वैरागमधील घटना

वैराग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा त्या टोळीच्या सदस्यांनी मारहाण करून खून केला. दोन एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास ही वैराग येथे ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने आठ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सुनील ऊर्फ पप्पू पवार (वय २७, रा. संजय नगर, वैराग, ता. बार्शी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर हरी केकडे (रा. वैराग), जुबेर शेख, मिथुन साळवे व अखिल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हरी यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ सुरेश महादेव पवार (रा. संजय नगर, वैराग ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

पवार कुटुंबीयांची वीटभट्टी आहे. फिर्यादी सुरेश व त्याचा भाऊ सचिन हे दोघे मिळून तो व्यवसाय करायचे. दोन एप्रिलला दुपारी चारच्या सुमारास सुरेश हा घराजवळ होता. तेव्हा त्याला राजाभाऊ पांढरमिसे याने फोन करून भाऊ सचिन याला कांबळेच्या दुकानात मारहाण सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आईला घेऊन सोलापूर रस्त्यावरील कांबळे यांच्या चप्पलच्या दुकानात गेले. तेथे संतोष गणेचेरी, सुनील धोकटे, चंदू कावरे व विठ्ठल कांबळे होते. दुकानासमोर जमिनीवर सचिन जखमी अवस्थेत पडला होता. तो विव्हळत दवाखान्यात न्या, असे म्हणत होता. तसेच हरी आणि त्याच्या टोळीतील चोरीच्या सोन्यावरून चाललेले भांडण सोडविले. त्यांना ‘तुमच्या टोळीचे नाव पोलिसांना सांगून भांडाफोड करेन’, असे म्हटले.त्यामुळे संशयितांनी कांबळे यांच्या दुकानातील लाकडी ठोकळा व धारदार हत्याराने मारहाण केल्याचे त्याने सांगितले.मारहाणीनंतर रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडल्यावर संशयित त्याची मोटारसायकल घेऊन पळून गेले. सचिनला उपचारासाठी आधी बार्शी नंतर सोलापूरला हलविले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...