आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:दुचाकीच्या कारणावरून नरेश चिंता याचा खून, आरोपी आणि मृत व्यक्तीने केली होती दारू पार्टी

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीच्या कारणावरून नरेश नागेश चिंता (वय २४, रा. विभाग नवीन विडी घरकुल, कुंभारी) याचा खून झाला आहे. राहुल यल्लाप्पा पुरूड (२२, रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी), अनिल दत्‍तात्रेय राडम (नवीन विडी घरकुल, कुंभारी) या दोघांना अटक झाली आहे.

राहुल याची दुचाकी एका व्यक्तीकडे दहा हजार रुपयांसाठी गहाण ठेवली होते. ती दुचाकी नरेश आणि अनिल दोघेजण परस्पर हैदराबादला पंधरा दिवसापूर्वी घेऊन गेले होते. नरेश हैदराबादमध्ये भावाकडे राहिला. अनिल हा दुचाकी घेऊन सोलापुरात आला. याला १५ दिवस लोटले होते. त्यानंतर २९ मार्च रोजी नरेश हा हैदराबादहून सोलापूरमध्ये आला होता. तिघेजण दिवसभर विविध ठिकाणी फिरले.

रात्री विडी घरकुल परिसरातील एका मैदानात दारूची पार्टी केली. नरेश‌ राहुलला म्हणाला की, तुझी दुचाकी कोण घेऊन गेले मला काही माहीत नाही. याबाबत काही केस झाली तर माझा त्याचाशी काही संबंध नाही. यावरून दोघांत वाद होऊन हाणामारी झाली. नरेश निपचीत पडला. यानंतर डोक्यात मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी अनिलने रिक्षा आणली. दोघांनी एका जवळच्याच नरेशला विहिरीत टाकले.

रक्ताने माखलेले कपडे, पिशवी सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी जाळून टाकले, अशी माहिती वळसंगचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षातून मृतदेह घेऊन जाताना घडलेला प्रकार समोर आला.

१५ दिवसांपूर्वीच नरेशने हातावर गोंदवले होते ‘आई’
पंधरा दिवसांपूर्वीच नरेशने ‘आई’ असे नाव हातावर गोंदवले होते. त्यानंतर थेट हैदराबादमध्ये भावाकडे कामासाठी गेला होता. हैदराबादवरून सोलापूरमध्ये आल्यानंतर तो घरी गेलाच नाही. दिवसभर दोन्ही मित्रांसोबतच फिरत होता. रात्री हा प्रकार घडला. मृतदेह सापडल्यानंतर आई गोंदवल्याचे पालकांना माहीत नव्हते. चेहरा पाहून त्याची ओळख पटली आहे.

बातम्या आणखी आहेत...