आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रामाणिक काम करणाऱ्याला त्रास होतो; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिध्देश्वर कारखान्याचे माजी चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांच्या नावाचा उल्लेख करीत पालकमंत्री म्हणाले समाजामध्ये प्रामाणिक काम करताना संकटाचा सामाना, थोडासा त्रासही सहन करावा लागतो. पालकमंत्री हे पद कायम नाही, लोकांच्या सेवेसाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करीत आहे. या भवनातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना चांगली अभ्यासिका करावी. या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

कुंभार वेस येथील जयभवानी मैदानात वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, धर्मराज काडादी, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल, राजशेखर विजापूरे, गुरुनाथ निंबाळे आदींसह लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, कन्नड भवनाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व्हावेत. भवनाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. जिल्हा नियोजन समितीतून एक कोटींचा निधी दिला जाईल. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक नियोजित आहे. यासाठी ४५ एकर जागा मंजूर झाली आहे.

याप्रसंगी माजी महापौर महेश कोठे म्हणाले की, कन्नड भवनसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून ७० लाखाचा निधी मंजूर केला आहे, त्याचे टेंडर दोन दिवसात निघणार आहे.

बातम्या आणखी आहेत...