आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एज्युकेशन अँड करिअर फेअरचे उद्धघाटन:एज्यूकेशन फेअर विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपुर्ण संधीचा पर्याय :आयुक्त राजेंद्र माने

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरात एकाच छताखाली नव्या प्रकारचे एक्स्पो फेअर घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षणाचा मार्गदर्शनाने मिळणारा पर्याय आहे. असे मत सोलापूर शहराचे नवे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.

ते शुक्रवारी सायंकाळी पोलीस कल्याण केंद्र सभागृहात दैनिक दिव्य मराठी एज्युकेशन अँड करिअर फेअर उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर, युनिट हेड नौशाद शेख, अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे प्रसिद्धीप्रमुख थॉमस आघमकर, डीएसपी सोनी महाविद्यालयाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, सोना शंकर ज्ञानविकास ट्रस्टचे अध्यक्ष कुमार करजगी, संजय घोडावत यूनिव्हर्सिटी कोल्हापूरचे समनव्यक सागर जानराव हे उपस्थित होते.

ते म्हणाले की. ''आमच्या काळात शिक्षणाला फार पर्याय नव्हते. मेडिकलला प्रवेश मिळाला नाही तर रयतला प्रवेश घेऊन बी. एड. करुन शिक्षकीपेशा स्विकारता येईल अथवा कोणतीही नोकरी करता येईल असे तेव्हाचे विचार होते. आताची पिढी नशीबवान आहे, त्यांना दिव्य मराठी सारखे वृत्तपत्र पुढाकार घेऊन मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. या फेअरमध्ये बँकेचे कर्जही मिळणार असल्याने याचाही लाभ घ्यावा तसेच जवळच्या लोकांनाही सांगावे असेही ते म्हणाले.

यावेळी थॉमस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली नातू यांनी केले तर आभार नौशाद शेख यांनी मानले.

आयुक्तांनी घेतली सखोल माहिती

उद्घाटनानंतर आयुक्त माने यांनी संपूर्ण एक्सफेर मध्ये फेरफटका मारत वेगवेगळ्या स्तरांवर नेमके काय आहे कोणत्या शिक्षण पद्धतीचा प्रसार करण्यासाठी कुठून संस्था आले आहेत त्याचा उपयोग काय आहे हे जाणून घेतले.

बातम्या आणखी आहेत...