आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुसऱ्याच्या नावे मराठी टायपिंग परीक्षेला बसवून टायपिंग कौशल्य असल्याचे प्रमाणपत्र देऊन एमकेसीएल लिमिटेडची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अेविस काॅम्प्युटरर्सचे प्रमुख अविनाश उत्तरेश्वर मठपती आणि व्यवस्थापक श्रावणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फौजदार चक्रधर ताकभाते यांनी विजापूर नाका पोलिसात सहा मार्च रोजी रात्री फिर्याद दिली आहे. विजापूर रोड आयटीआय पोलिस चौकीच्या बाजूला अेविस काॅम्प्युटर्स सेंटर आहे. चक्रधर ताकभाते यांना मराठी टायपिंग प्रमाणपत्र पाहिजे होते. या सेंटरमध्ये जाऊन मराठी टायपिंग प्रमाणपत्राची विचारणा केली. पैसेही भरले.
त्यांच्या नावे एमकेसीएल लिमिटेड (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे) काॅम्प्युटर टायपिंग स्पीड टेस्ट ३७ शब्द प्रतिमिनीट या गतीचे एमकेसीएल संचालक यांचे सहीचे व शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले. दरम्यान, एमकेसीएल लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षण देणारी अेविस काॅम्प्युटर सेंटर येथे कोणत्याही प्रकारे मराठीत काॅम्प्युटर टायपिंग सराव व परीक्षा दिली नसताना फौजदार ताकभाते यांच्या ऐवजी कोणाला तरी परीक्षेला बसवून त्यांना प्रमाणपत्र दिले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमकेसीएल लिमिटेडची फसवणूक केली म्हणून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता अजून याबाबत चौकशी सुरू आहे. दोघांचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.