आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहस वार्ता:एसटीत प्रवाशाने विष घेतले, जीव वाचवण्यासाठी गाडी थेट सिव्हिलमध्ये ; सर्व प्रवासी तणावात

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालत्या एसटीमध्ये सिद्धेश्वर गुरुदास स्वामी (वयय- ५३,रा. नूतन प्रशालेजवळ, द्वारका नगरी विजापूर रोड सोलापूर) या प्रवाशांने बसल्या जागेवर विष प्राशन केल्याचे समजताच एसटी चालकाने एसटी थेट सिव्हिल हॉस्पिटलला आणल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. मात्र पोलिसात विष प्राशनाची नोंद नव्हती. दीडच्या सुमारास सोलापूर बस स्थानकात कराड ते उस्मानाबाद एसटीत (एमएच. बी टी -१४- ३५७७) सिद्धेश्वर गुरुदास स्वामी हे तुळजापूर येथे जाण्यासाठी गाडीत बसले. गाडीत केवळ ७- ८ प्रवासी होते. गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच गाडीत घाण येऊ लागली. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर वाहक कचरे यांनी मागच्या दिशेने पाहिल्यानंतर स्वामी यांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा कचरे यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. सगळे प्रवासी घाबरले. दरम्यान पोलिसांना फोन केला. वेळप्रसंग पाहून वाहक जी. एम. कचरे व चालक एन. एस. कांबळे यांनी गाडी थेट सोलापूरच्या सिव्हीलला आणली. एसटीतील प्रवाशांना इतर एसटीत वर्ग केले. याबाबतचा अधिक तपास ठाणे अंमलदार घोळवे करत आहेत. तुळजापूरचे काढले होते तिकीट स्वामी यांनी एसटीत बसल्यानंतर १०० नोट देऊन तुळजापूरचे तिकीट मागितले. वाहक गजरे यांनी ७० रुपये तिकीट आहे आपण २० रुपये वरचे द्या ५० रुपये देतो असे म्हणाले. त्यावर स्वामी यांनी २० ची नोट काढून दिली आणि ५० रुपयाची नोट परत घेतली.दरम्यान काहीच मिनिटांच्या अंतरावर स्वामीने विषारी औषध घेतल्याचे निदर्शनास आले.

वेळप्रसंग पाहून निर्णय घेतला ^विष घेतल्याने स्वामीला उचकी लागली होती. त्यांच्या तोंडाला फेस आला होता. सर्व प्रवासी तणावात होते. त्यांनी कोणते विष प्राशन केले हे कळले नाही. वेळ न दवडता आम्ही जिल्हा रुग्णालयात दाखल केले . जी. एम. कचरे, कराड डेपो, वाहक

बातम्या आणखी आहेत...