आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी:28 पासून अर्ज भरण्यास सुरुवात; 7 डिसेंबर शेवटची तारीख

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. कुठलाही अवचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलिस यंत्रणा आता सतर्क झाली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होणार आहे. निवडणूक शांततेत व न्याय वातावरणात पार पडावी, या हेतूने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत.

अर्ज भरायला येताना उमेदवार व सूचकासह केवळ पाच लोकांनाच त्याठिकाणी प्रवेश असणार आहे. जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया उत्तर तहसील कार्यालयात सुरू आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून पोलिस आयुक्तांनी उत्तर तहसील कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या आतील परिसरात मोबाईल, टॅब्लेट, संगणक, पेजर तथा संदेशाची देवाण-घेवाण करणारी विद्युत उपकरणे हाताळता येणार नाहीत. तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर तथा अन्य ज्वालाग्रही पदार्थ आत नेता येणार नाहीत. निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक कार्यालयाने पास दिलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही प्रवेश असणार नाही. कोणतेही शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. पासधारक वाहनांशिवाय अन्य वाहनांना तेथे 'नो एन्ट्री' असेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात गुलाल उधळणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा देण्यावर बंदी असेल, असेही पोलिस आयुक्तांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. त्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. माध्यम प्रतिनिधींना आदेशातून सूट आहे. आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड विधानाचे कलम 188 अंतर्गत कारवाई होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते 7 डिसेंबरपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...