आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोनेरी विद्युत रोषणाईच्या माळा प्रत्येक कोपरानंकोपरा उजळत तमिळनाडू येथील वेल्लोरच्या गोल्डन टेम्पोच्या धर्तीवर सम्राट चौकातील सद्गुरु श्री प्रभाकर महाराज मंदिर मंगळवारी सोनेरी रंगाने उजळले होते. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराची काया बदलत आली आहे. यंदाच्या वर्षी या मंदिरात मंदिर समितीने विद्युत रोषणाईचा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे उद्घाटन विजयकुमार देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट, राजन जाधव, संजय कणके, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर उपस्थित होते.
प्रोफाइल विद्युत रोषणाई ..
प्रोफाइल लाइटिंग म्हणजे एकाच सरळ रेषेत असलेली ही कोणत्याही प्रकारची हानी न करणारे किंवा डोळ्यांना त्रास न देणारी अशी रोषणाई आहे. एकूण ७ हजार फूट इतकी याची लांबी रुंदी आहे. साधारण ८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यात केवळ सोनेरी रंगाचा वापर करण्याचा अधिक प्रयत्न केला आहे. मंदिर समितीने उत्सव सणांना तसेच दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत रोषणाई भाविकांना पाहता येणार आहे.
पुण्यतिथीनिमित्त तयारी
हजारो भक्तमंडळी दरवर्षी प्रभाकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दि. ६ रोजी या मंदिरात येतात. आनंद घेतात. नाम कीर्तन,भजन, नामस्मरण करतात. भक्तांना या मंदिरात आल्यानंतरचा क्षण क्षण आनंद देणारा ठरावा या भूमिकेतून मंदिराची रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाची नवीन संकल्पना अमलात आणली आहे ही वेल्लोरच्या गोल्डन टेम्पल च्या धर्तीवर केली आहे. - उदय वैद्य, ट्रस्टी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.