आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड:सोलापूर रेल्वे स्थानकातील सुरक्षा पुन्हा थंडगार, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रेल्वे स्थानकावर जिलेटिन कांड्या प्रकरणानंतर सोलापूर रेल्वे स्थानकात तेही रेल्वे सुरक्षा बलाने कडक अशी सुरक्षा तैनात केली होती. याकरिता श्वानपथक अनेक सुरक्षा रक्षक कर्मचारी यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांची बॅगेची तपासणी करणे, अशा अनेक गोष्टी सुरू केल्या होत्या. मात्र हे सर्व एकच आठवडा करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सर्व दुसऱ्या आठवड्यात जवळपास गुंडाळण्यात आली असून सध्या रेल्वे स्थानकातील सुरक्षा पुन्हा थंडगार झाली आहे.

वास्तविक रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बलाचे तपासणी पथक तैनात असायलाच हवी करणे एरवीही चोऱ्यांचे प्रमाण अधिक असून सोलापूर विभाग मात्र त्याकरिता प्रसिद्ध आहे. कारण पुण्या-मुंबईच्या तुलनेने तेव्हा कर्नाटक व दक्षिणेतील पुढील भागाच्या तुलनेने सोलापूरच्या मोहोळ ते पारेवाडी जिंती या दरम्यान चोरीचे प्रमाण अधिक असून रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी याबाबत पुन्हा विचार करण्यासारखे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. पुण्याच्या प्रकरणानंतर त्यानिमित्ताने का असेना सोलापूरच्या स्थानकावर श्वानपथक आणि रेल्वे सुरक्षा बलाचे पथक उभे होते. यामुळे प्रवाशांमध्ये आपण सुरक्षित आहोत, अशी भावना निर्माण झाली होती. मात्र पुन्हा एकदा ही सुरक्षा काढून काहीही घडलं तरी प्रवाशांनी प्रवाशांची सुरक्षा करायची किंवा या सुरक्षेला काही महत्त्व नाही, हेच सिद्ध झाले आहे.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची

रेल्वे भारतात एवढे उत्पन्न मिळते प्रवासी नसतील तर रेल्वे चा उपयोग काय ? मात्र याच रेल्वेतून प्रवास करत असताना जर एखाद्या महिला प्रवाशाला काही प्रॉब्लेम झाला किंवा ती संकटात अडकली तर तिचं संरक्षण करण्यासाठी ताबडतोब पोलीस धावत जावेत किंवा स्थानकात रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलिस तैनात असायला हवेत. पण सहसा तसे पाहायला मिळत नाही. अक्षरशहा एका पूर्ण रेल्वेला दोन-तीन पोलिसांच्या हातात सुपूर्द करून प्रवास केला जातो. हजारो प्रवाशांच्या पाठीमागे 3 - 4 पोलीस काय करू शकणार आहेत. त्याचा विचार दरोडेखोरांच्या डोक्यातही येत असेलच किंवा असा घातपात करणाऱ्यांच्या डोक्यातही हा कट शिजत असेल तेव्हा प्रशासनाने याचा विचार करून सुरक्षा वाढवावी आणि नेहमीच श्वानपथक आणि गस्त घालणारे पथक तैनात ठेवावे, असे प्रवासी निर्मला सारंग यांनी म्हटले

बातम्या आणखी आहेत...