आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील १० लाख लाेकांच्या भावनांचा आदर करून सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाचा ठराव महापालिकेच्या सभागृहात झाला. ताे बहुमताने नव्हे, एकमताने आणि काँग्रेसचे त्यावेळचे गटनेते चेतन नराेटे यांच्या उपस्थितीत झालेला आहे. केवळ राजकीय पाेळी भाजून घेण्यासाठी भाजपकडे बाेट दाखवू नये, असा सल्ला महापालिकेतील भाजपचे माजी पक्षनेते शिवानंद पाटील यांनी दिला. साेमवारी कारखाना बचाव कृती समितीच्या माेर्चेत सहभागी हाेऊन श्री. नराेटे यांनी हाेम मैदानावरील जाहीर सभेत महापालिकेतील ठरावाचा प्रसंग सांगितला हाेता. ठरावाच्या विराेधात भाजपचेच सदस्य मनाेज शेजवाल उभे हाेते. त्यांना पक्षनेते म्हणून शिवानंद पाटील यांनी बसवले. भाजपनेच हा ठराव संमत केल्याचे श्री. नराेटे म्हणाले. त्यावर श्री. पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
बेकायदेशीर कारभारामुळेच काेर्टकचेरी, आर्थिक भुर्दंड कारखान्याचे माजी तज्ञ संचालक संजय थाेबडे यांचे नाव टाळून, धर्मराज काडादी यांनी सभेत त्यांच्यावरही टीका केली. कारखान्याच्या विराेधात तक्रारी असल्याने काेर्टकचेरी आणि आर्थिक खर्च वाढल्याचे ते म्हणाले हाेते. त्यांना उत्तर देताना श्री. थाेबडे म्हणाले, ‘‘बेकायदेशीर कामांमुळेच काेर्टकचेऱ्या वाढल्या. त्याला काडादी व्यक्तीश: जबाबदार आहेत. काेर्टकचेरीचा खर्च मात्र कारखान्याचा सुरू झाला. या आर्थिक भुर्दंडालादेखील तेच जबाबदार आहेत. इतरांवर खापर फाेडून चालणार नाही. कायद्याच्या चाैकटीतच कामे झाली असती तर काेर्टकचरी करण्याची वेळच आली नसती. आता शेतकऱ्यांना पुढे करून त्याचा भावनिक मुद्दा करत आहेत. परंतु न्यायालयीन निर्णय भावनेवर हाेत नाहीत.’’
काेठे यांचे आयटी पार्क गेले काेठे? उत्तर द्यावे! माजी महापाैर महेश काेठे यांनी आयटी पार्क उभारण्याची तयारी केली हाेती. पुण्यात काही कंपन्यांसाेबत बैठकही झाली. त्यानंतर काय झाले? केवळ विमानसेवा नसल्याने आयटी कंपन्यांनी साेलापूरला येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले. ही बाब त्यांनी सभेत का सांगितली नाही? केवळ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विराेधात बाेलण्यासाठी काडादी यांच्या मंचावर गेले हाेते. महाविकास आघाडी सरकार असताना, त्यांनी कारखान्याच्या चिमणीला परवानगी का मिळवून दिली नाही? आमदार देशमुख यांनी स्मार्ट सिटी याेजनेतून सिद्धेश्वर मंदिराला भरीव निधी मिळवून दिला.’’ शिवानंद पाटील, माजी पक्षनेते, भाजप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.