आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Road From Old Naka To Patrakar Bhavan Will Be 25 To 42 Meters From 18; Assessment Of Affected Properties Will Start, It Will Take Months |marathi News

उड्डाणपूल भूसंपादन:जुना नाका ते पत्रकार भवन रस्ता 18 वरून 25 ते 42 मीटर होणार; बाधित मिळकतींचे मूल्यांकन सुरू, महिना लागणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रस्तावित दोन उड्डाणपुलांपैकी एकाच्या बांधकामासाठी भूसंपादन प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जुना पुना ते पत्रकार भवन रस्त्यावरील बाधित होणाऱ्या मिळकतींचे मूल्यांकन करत आहे. या कामासाठी एक महिना लागणार आहे. हा रस्ता सध्या १८ मीटरचा असून रुंदी वाढून तो २५ ते ४२ मीटर रुंद होणार आहे. त्यासाठी डाव्या बाजूची जागा घेण्यात येत आहे.

भूसंपादन विभाग बाधित मिळकतींची माहिती प्रसिद्ध करणार आहे. त्यावर सूचना, हरकती घेतल्या जातील. सुनावणी झाल्यानंतर भूसंपादन सुरू होईल. यावेळी महापालिकेचे एस. व्ही. एकबोटे, डी. बी. शिंदे, एस. बी. खानापुरे, ए. सी. गदगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एम. लंगोटे, ए. ए. पटेल, एस. एस. हुमनाबादकर, आर. एम. कलशेट्टी आदी उपस्थित होते.

बांधकाम परवाना असलेल्याच इमारतींना मोबदला दिला जाणार आहे. अनधिकृत बांधकाम असल्यास मोबदला मिळणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, नविन नियमानुसार भाडेकरूलाही भरपाई दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अनधिकृत बांधकामास मोबदला नाही, भाडेकरूसही भरपाई दिली जाणार
पुना नाका ते पत्रकार भवन या मार्गावर जेवढ्या मिळकती बाधित होणार आहेत. मनपाकडून रीतसर घेण्यात आलेला बांधकाम परवाना घेतला आहे त्याची माहिती महापालिकेला द्यावी. अन्यथा अनधिकृत बांधकामाचा मोबदला मिळणार नाही. तसेच नवीन नियमानुसार भाडेकरूलासुध्दा नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ज्या इमारतीचा मोठा भाग बाधित होणार आहे आणि उर्वरित भागाचा त्याला काहीच लाभ होणार नाही अशा मिळकत धारकांना मोबदला जास्त दिला जातो. हे सर्व नियमानुसार होणार आहे, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.’’
केशव जोशी, विशेष अधिकारी भूमी संपादन.

डाव्या बाजूचे भूसंपादन
जुना पूना नाका ते शिवाजी महाराज चौकापर्यंत डाव्या बाजूला अडीच ते तीन मीटर, शिवाजी महाराज चौक ते मेकॅनिक चौकापर्यंत साडेपाच ते सहा मीटरपर्यंत भूसंपादन होईल. एसटी स्टॅण्डचा भाग, प्रसिद्ध दत्त हाॅटेल, हाॅटेल वैष्णव, माणिकचंद चाळ व हाॅटेल अजंठाचा भाग यात जाईल.

तीन टप्प्यात असणार पूल
जुना पुना नाका येथे सुरू झालेले उड्डाणपूल अण्णाभाऊ साठे (भय्या) चौक संपेल. भय्या चौक ओलांडल्यानंतर पुन्हा उड्डाणपुलाला महात्मा गांधी पुतळ्याच्या अलीकडे संपेल. रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेले उड्डाणपुल सात रस्त्याला येथे संपेल.

बातम्या आणखी आहेत...