आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालगर्जीपणा:रूपाभवानी ते बलिदान चौक रस्त्याची करताहेत वरवरची डागडुजी; खडी घालून वेळ मारून नेण्याचा प्रकार

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी वारीसाठी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी ३ जुलै रोजी सोलापुरात येत आहे. या निमित्ताने रूपाभवानी चौक ते बलिदान चौक या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. रस्ता खचल्याने त्यात खडी घालून तात्पुरती दुरुस्ती केल्याचे दिसत आहे. वेळ मारून नेण्याच्या या प्रकारामुळे हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.

रूपाभवानी चौकात महापालिकेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यात येते. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आल्याने दुरुस्ती करण्यात येत आहे. रस्ता खचलेला असतो तेव्हा तो तंत्रशुद्ध पद्धतीने पुन्हा खोदून दुरुस्ती करणे आवश्यक असते. पण तसे होताना दिसत नाही. केलेला रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे रस्ता करून न केल्यासारखी स्थिती आहे. अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले. त्यानंतर ती लाइन दुरुस्त करणे आवश्यक होते. परंतु दुरुस्ती केलीच नाही. परिणामी त्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे.