आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंकू राजगुरू:आठवा रंग प्रेमाचा चित्रपटातील ‘कृतिका’ची भूमिका ‘आर्ची’पेक्षा खूप वेगळी

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आठवा रंग प्रेमाचा’मधील कृतिका ही ‘सैराट’च्या आर्चीपेक्षा निश्चितच वेगळी आहे. कृतिका ही मुंबईची. तिची भाषा, राहणीमान वेगळे. काॅल सेंटरमधील जॉब सांभाळत ती सरळ जगताना तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. नंतरचे तिचे आयुष्य वेगळ्याच वळणावर जाते. चित्रपटातील पाच गाणी रसिकांना नक्की आवडतील . सांगत होती अभिनेत्री रिंकू राजगुरू.

दिग्दर्शिका खुशबू सिन्हा प्रथम हिंदीतूनच हा चित्रपट निर्माण करणार होत्या, पण कृतिका ही मंुबईतील व्यक्तिरेखा असल्याने मराठीतून केला आहे. कृतिकाच्या भूमिकेचा अभ्यास केला, असे रिंकूने सांगितले. आठवा रंग प्रेमाचा हा चित्रपटातील विशाल मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. तो मूळचा दिल्लीतील आहे. पुणे व मुंबईत शिक्षण झाले.

‘सावित्रीबाई’ साकारायला आवडेल
ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याविषयी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात रिंकू म्हणाली, मला सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारायला आवडेल.
दिसण्यावर, भाषेवर काम करावे लागले. आर्चीच्या भूमिकेचा रसिकांवरील ठसा अजून कायम आहे, हे फॅन्सद्वारे जाणवतेही. हे सर्व एन्जॉय करते. कृतिकाच्या शहरी भूमिकेला साजेसी अशीच भाषा चित्रपटात आहे. मी मात्र गावाकडची भाषा विसरली नाही. सोलापुरी भाषा बोलतेच. आर्ची ही खेडेगावातील होती. काहीच न समजणारी. कृतिका ही मॅच्युअर, शिकलेली, मुंबईत वाढलेली मुलगी आहे. त्यामुळे भूमिकेनुरूप भाषा चित्रपटात आहे. यासाठी मला भाषेवर काम करावे लागले. मला दिसण्यावर काम करावे लागले. मुंबईच्या मुलींचे चालणे बोलणे, कपडे घालण्याची पद्धत सर्व वेगळे आहे. अभिनेत्री म्हणून नवनवी आव्हानात्मक भूमिका मिळत आहे. तरी हा सोलापूरच्या लेकीचा चित्रपट आहे, असे म्हणता येईल.

अवांतर वाचन आवडते
मी घरी गावाकडची असते, तशीच वागते. परिस्थितीनुसार थोडा बदल झालाही असेल. पण मुंबई-पुण्यात राहिल्याने जे काही नकळत बदल माझ्यात झाले असतील तेवढेच. जाणूनबुजून व्यक्तिमत्त्वात बदल केला नाही. तसा भाषेतील बदल हा पुस्तक वाचनातूनही झाला असावा. कारण अवांतर वाचन आवडते. मी पदवीच्या (बी. ए.) अंतिम वर्षात शिकत आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू, विशाल यांची ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट

बातम्या आणखी आहेत...