आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकांची‎ सहविचार सभा‎:शिष्यवृत्ती परीक्षेतील टक्का‎ वाढवण्यावर भर देणार‎

सोलापुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक‎ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना‎ (एनएमएमएस) मध्ये‎ साेलापुरातील मुलांचा टक्क वाढला‎ पाहिजे. राज्यात साेलापूर‎ प्रथमस्थानी आले पाहिजे. यासाठी‎ साेलापूर मुख्याध्यापक संघाची‎ आघाडीची भुमिका असेल.‎ शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण खुल्या‎ वर्गातील मुलांना सारथीकडून‎ शिष्यवृत्ती देण्यात येते.तरी त्यांचे‎ प्रस्ताव फेब्रुवारी अखेर सारथी‎ कार्यालयात जमा करावेत,जेणेकरुन‎ मुलांना वर्षाकाठी दहा हजार‎ मिळतील.

तरी अर्ज वेळेत दाखल‎ करावे असे आवाहन मुख्याध्यापक‎ संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी माने‎ यांनी केले.‎ वालचंद महाविद्यालयात‎ मुख्यध्यापकांची सहविचार सभा‎ घेण्यात आली. त्यावेळी माने बोलत‎ होते. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी‎ भास्करराव बाबर,‎ सहा.समाजकल्याण आयुक्त‎ साळुंखे, गटशिक्षण विस्तार‎ अधिकारी सुहास गुरव, श्रावण‎ बिराजदार, बी.जी.कुलकर्णी,‎ उपस्थित होते. सुहास गुरव यांनी‎ दहावी,बारावीच्या परीक्षासंदर्भात दि.‎ १० रोजी बैठक घेण्यात येणार‎ असल्याचे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...