आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण उत्सव:जगद्गुरूंच्या मंत्रोच्चारात सुरू झाला सिद्धेश्वर मंदिरातील श्रावण उत्सव

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंखनाद, धूप, दीप, नैवेद्य, फुलांची सजावट आणि मंत्रोच्चारात जगद्गुरूंनी अनुष्ठानाला सुरुवात करत सिद्धेश्वर मंदिरातील श्रावण उत्सवाला सुरुवात केली. यावेळी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती.

गुरुवारी पहाटे ४ ते ६ दरम्यान, काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य यांनी महाअनुष्ठान बिल्वपत्राच्या वाहण्याच्या कार्यक्रमाने सुरू झाले. यावेळी समाजातील मान्यवर भक्तांच्या हस्ते ही बिल्वपत्र रचना आणि फुलांची रचना जगद्गुरूंच्या भोवती शिवलिंगाभोवती रचण्यात आली होती. आकर्षक आणि मोहक अशा पद्धतीने ही बिल्व रचना करण्यात आली होती. यावेळी नमः शिवायच्या जयघोषात सर्व उपचारासह जप व ध्यान साधना संपन्न झाली. सूर्योदयाच्या वेळी ६ ते ८:३० पर्यंत इष्टलिंग महापूजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी महामंगल आरतीत सहभाग नोंदविला. सायंकाळी महिलांच्या भजनी मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवस्थान कमिटीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...