आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाकळी ते कोंढार चिंचोली (ता. करमाळा) येथील डिकसळ पुलादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूची साइड पट्टी खचली अाहे. वाहन चालकास तारेवरची कसरत करावी लागते. अरुंद असल्यामुळे अपघाताचा धाेका संभवतो. त्यामुळे या मार्गावरील साइडपट्ट्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांना भिगवण, बारामती, पुणे येथे जाण्यासाठी तर र्कोर्टी ते टाकळी रस्ता झाल्याने रस्ता रहदारीचा झाला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती लवकर व्हावी.
ठेकेदाराकडून दुर्लक्ष, दुरुस्ती करावी डिकसळ पूल ते टाकळी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झाले असून, संबंधित ठेकेदाराकडे पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीचे काम आहे. तरीही ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी दुरुस्ती करावी. -किरण कवडे, माजी संचालक आदिनाथ कारखाना.
पाहणी करून सूचना देऊ डिकसळ पुल ते टाकळी दरम्यान साइड पट्टीबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित ठिकाणी पाहणी करून साइडपट्टी मजबूत करण्यासंदर्भात सूचना देण्यात येईल. -एन. पी जाधव ऊपअभियंता. सार्वजनिक बांधकाम विभाग. सोलापूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.