आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंब्रज भाकणुकीत बंदुकीचा संकेत:काठीने बंदुकीचा इशारा करत आवाज, लावताहेत वेगवेगळे अर्थ‎

दक्षिण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ कर्नाटक हद्दीतील उंब्रज गावच्या रेवणसिद्ध‎ देवाच्या भाकणुकीत राजकीय आणि नैसर्गिक‎ भाष्य झाले. भाकणूक सांगणाऱ्या पुजाऱ्याने‎ डोक्यावरील टोपी काढली नाही, मात्र हातातील‎ काठीने बंदुकीचा इशारा करत आवाज केला.‎ यावरून देशात सरकार स्थिर राहील, पण‎ बंदुकीच्या इशाऱ्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात‎ आहेत. तसेच अन्नधान्याचा सुकाळ राहील, ‎ ‎ पाऊसमानही चांगले राहील, असे भाकीत व्यक्त ‎ ‎ करण्यात आले.‎ महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील भीमा‎ नदीच्या काठावरील भंडारकवठे गावचे ग्रामदैवत ‎ ‎ शिवयोगी महासिद्ध देवाची मूक भाकणूक व‎ कर्नाटकातील उंब्रज गावच्या ग्रामदैवत रेवणसिद्ध‎ देवाची भाकणूक झाली.

शनिवारी दुपारनंतर व‎ रविवारी पहाटे चारच्या दरम्यान भाकणूक झाली.‎ दोन्ही गावाची भाकणूक पाहण्यासाठी कर्नाटक व‎ महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.‎ दरम्यान, भंडारकवठे येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ एक वाजता डोणज (मंगळवेढा) येथील देवाचे‎ बैल व पुजारी महासिद्ध मंदिरात आले. आलेल्या‎ पुजारी मंडळींनी येथील पुजाऱ्यांना जेवण दिले.‎ बैल मंदिर परिसरात फिरले पण कडबा खाल्ला‎ नाही. मातीच्या दोन्ही घागरीतील पाणी पुजाऱ्यांनी‎ सांडले. यावरून खरीप रब्बी हंगामासाठी‎ पाऊसमान चांगला राहील.‎

उंब्रज येथील गाजलेले भाकित‎ १९८४ मध्ये उंब्रज येथील भाकणुकीत पुजारी‎ कन्नडमध्ये येणं सत्ती कुंयाव्वा म्हणून रडला‎ होता. दरम्यान त्याच वर्षी माजी पंतप्रधान इंदिरा‎ गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर काही‎ वर्षांपूर्वी झालेल्या भाकणुकीत पुजाऱ्याने टोपी‎ बदलली. त्यावर्षी केंद्रात सत्तांतर झाले. यावेळी‎ टोपी बदलली नाही. मात्र, हातामध्ये असलेल्या‎ काठीची बंदुकीसारखा इशारा करत ठो ठो‎ आवाज केला. यामुळे देशावर कोणते संकट‎ येईल. युद्ध होईल की आणखी काही, अशी चर्चा‎ जाणकारांमध्ये होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...