आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटका तांडा:कळसुबाई शिखरावर घुमला डॉक्टर हिरकण्यांचा आवाज; लेडीज स्पेशल ट्रेकिंगचे आयोजन

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इको फ्रेंडली क्लबच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर लेडीज स्पेशल ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. भंडारदरा जलाशय आणि आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत भटकंती करण्यात आली. या उपक्रमात सोलापुरातील डॉक्टर आणि शिक्षक महिलानी सहभाग नोंदविला.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिखर भंडारदरा जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात साम्रद गावात या सर्व महिला दाखल झाल्या. तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय..., भारत माता की जय.. या घोषणा देत आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत ट्रेकिंगसाठी मार्गस्थ झाले.

छोट्या-मोठ्या दगडांवरून तसेच कमरे एवढ्या थंडगार पाण्यातून वाट काढत निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेली सांदण दरी सर्वांनी पाहिली. त्यानंतर या सर्वांनी काजव्यांच्या निरीक्षण करत निसर्गाचा चमत्कार अनुभवला. त्यानंतर वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्यांचा आधार घेत सर्वजण कळसुबाई शिखरावर पोहोचले.

हातात भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी आणि नाकात नथ घालून महिला डॉक्टरांच्या रॉकिंग ग्रुपने कळसुबाई शिखरावर जल्लोष केला. कळसूबाई देवीला आणि निसर्गाला सर्वजण नतमस्तक झाले. तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावल्यानंतर बारी गावाच्या दिशेने सर्वजण खाली आले.

शालेय साहित्याचे वाटप!

कळसुबाई शिखर भटकंतीमध्ये सहभागी झालेल्या डॉ. ज्योती मोकाशी यांनी भंडारदरा परिसरातील दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भेट दिले.

बातम्या आणखी आहेत...