आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. पण अनेक ठिकाणी त्या अजूनही रस्त्यावर उघड्या स्थितीत आहेत. काम रेंगाळले असून, त्याची जबाबदारी महावितरण आणि महापालिका एकमेकांवर ढकलत आहेत. दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असून, कागदी घोडे नाचवण्याचे काम होत आहे. काम करण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा थांबवला नाही, असा आरोप महापालिकेकडून केला जात आहे.
आवश्यक कागदपत्रे काही दिवसांपूर्वी महापालिकेने दिली आहेत. आता लवकरच काम होईल, असे महावितरणाचे म्हणणे आहे. उघड्या विजेच्या तारांमधून विजेचा धक्का लागून बाळीवेस परिसरात एका चिमुकलीचा जीव गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी एका कुत्र्याचा जीव गेला होता. भूमिगत तारांचे काम विजय इन्फास्क्चरला दिले आहे. १०.८ किमी कॉँक्रिट रस्तेकाम पूर्ण झाले आहे.
याच्या दोन्ही बाजूने विजेच्या तारा भूमिगत करण्याचे काम केले जात आहे. याची वर्कऑर्डर २५ फेब्रुवारी २०१९ला दिली. कामाची मुदत १८ महिने होती. ती ऑक्टोबर २०२० मध्ये संपली. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे मुदतवाढ देण्यात आली. काम १०३ कोटींचे होते. नंतर बदल होत ते ११५ कोटींपर्यंत गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.