आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:इंद्रभुवनसमोरील वारद यांचा पुतळा हॉलमध्ये हलवून संग्रहालय करणार

सोलापूर / चंद्रकांत मिराखोर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंद्रभुवन इमारतीसमाेरील अप्पासाहेब वारद यांचा पूर्णाकृती पुतळा आतील बाजूस हाॅलमध्ये स्थलांतरित करून त्याठिकाणी वारदांविषयी नागरिकांना माहिती देणारे संग्रहालय करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी वारद यांच्या वारसांना विचारून त्यांची सहमती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. इंद्रभुवन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर पालिका आयुक्तांचे कक्ष असणार आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिकांना तिसऱ्या मजल्यावर जावे लागणार आहे.

महापालिकेची ऐतिहासिक इंद्रभुवन इमारत दुरुस्त करण्यात येत असून, तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिका आवारातील इंद्रभुवन इमारत नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या कामाची पाहणी आयुक्त तेली-उगले यांनी केली. तसेच काही सूचना केल्या. सुशोभीकरणानंतर या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. तळमजल्यावर संग्रहालय असणार आहे. तेथे वारद यांचा पुतळा स्थलातरीत करून सुशोभित करण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. पहिला मजला रिकामा असणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर पालिका आयुक्तांचे कक्ष असणार आहे. तेथे नागरिकांना बसण्यासाठी हाॅल, मीटिंग हाॅल, नागरिकांना येण्यासाठी दोन लिफ्ट बसवण्यात येणार आहे. तेथील कामाच्या दर्जा आणि नियोजन यांची माहिती आयुक्त तेली उगले यांनी जाणून घेतली.

नागरी सेवा सुविधेची घेतली माहिती आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिक महापालिकेत येतात. ते आल्यावर त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था कोठे असेल याची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. याशिवाय त्यांच्यासाठी प्रसाधन गृहाबाबत चौकशी केली.

वारदांच्या वारसांना विचारून निर्णय घेण्यात येणार इंद्रभुवन इमारतीसमोर असलेला अप्पासाहेब वारद यांचा पुतळा आतील बाजूस ठेवून त्या बाजूस प्रदर्शन व इमारतीसह वारद यांच्याविषयी माहिती देण्याचा विचार आहे. वारदांच्या वारसदारांना विचारून निर्णय घेण्यात येईल. कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. शीतल तेली-उगले, पालिका आयुक्त.

पुतळा हलवण्यास विरोध उपोषणास बसणार अामच्या आजोबांनी शहरासाठी काम केले. त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात प्रदर्शनीय भागात असावा. आत कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेवू नये. इंद्रभुवनसमोरील पुतळा हलवण्यास आमचा विरोध आहे. तसे झाल्यास आम्ही गंभीर होऊ, आणि पालिकेसमोर उपोषण करु. महिंद्र वारद, कै. अप्पासाहेब वारद यांचे वारस

निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल अप्पासाहेब वारद यांचा पालिका आवारातील पुतळा हलवण्यास वीरशैव व्हीजनचा विरोध आहे. महापालिका आयुक्तांनी तसा निर्णय घेऊ नये. पुतळा हलवण्याचा प्रयत्न झाल्यास वीरवैश व्हीजन शहरात आंदोलन करेल आणि पालिकेत उपोषण करेल. वारद परिवारासोबत आम्ही आहोत. राजशेखर बुरकुले, वीरशैल व्हीजन

बातम्या आणखी आहेत...