आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची कहाणी म्हणजेच ‘आठवा रंग प्रेमाचा’

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवा रंग प्रेमाचा एका नवीन धाटणीचा चित्रपट आहे. दि. १७ जून रोजी संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होत आहे. एक वेगळी प्रेम कहाणी आणि महिलांवर होणारे विविध प्रकारचे अत्याचार, प्रेम कहाणी या आशयाचा चित्रपट असल्याची माहिती मुख्य नायिका रिंकू राजगुरू आणि नायक विशाल आनंद यांनी दिली. सोमवारी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी विजापूर रोडवरील मयूर वन या मंगल कार्यालयात आले होते. स्पाइस अॅण्ड आइसचे अनिश सहस्रबुद्धे यांनी दोघांचे स्वागत केले.

काळ कितीही आधुनिक झाला तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रश्नाबरोबरच एका प्रेम कहाणीवर आधारित आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच झाला आहे.

१७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरूने अॅसिड (व्हिक्टिमची ) भूमिका करत आहे. पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनचे समीर कर्णिक यांनी “आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांची आहे. चित्रपटातील गाणी कुणाल गांजावाला, सोनू निगम, आदर्श शिंदे, शाहिद मल्ल्या, साक्षी होळकर यांनी गायली आहेत. मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता पदार्पण करत आहे.

टीजरला मिळतोय चांगला प्रतिसाद...
रिंकूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदचा आश्वासक अभिनय यामुळे टीजरनं दमदार प्रतिसाद मिळवला आहे. प्रेमकथेसह स्त्रियांवरील अत्याचार, अॅसिड हल्ला असे गंभीर मुद्दे या चित्रपटातून हाताळण्यात आल्याचे सांगण्यात आले. लक्षवेधी टीजर आणि ट्रेलरमुळे प्रेमाचा आठवा रंग या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षकांना १७ जूनची प्रतीक्षा आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा, प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा, असे आवहन रिंकू राजगुरू यांनी केले आहे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...