आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामहिंगणी:अंकोलीच्या विद्यार्थ्यांनी घेतला शून्य सावलीच्या क्षणाचा अनुभव

रामहिंगणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकोली (ता. मोहोळ) येथील इनोव्हेटिव्ह स्कूलमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मंगळवारी १० मे रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी शून्य सावलीच्या क्षणाचा अनुभव घेतला. वर्षभर सोबत असणारी आपली सावली काही क्षणासाठी आपल्याला सोडून दिसेनाशी होते. वर्षातून दोनवेळा कर्कवृत्त ते मकरवृत्ताच्या दरम्यान सावली काही क्षणासाठी गायब होते. ते दिवस शून्य सावली दिवस म्हणून साजरे करतात. सूर्य रोज डोक्यावर येत नाही. फक्त या दोन अक्षवृत्तादरम्यान शून्य सावली दिवसाच्या वेळी डोक्यावर येतो तेंव्हा सावली दिसत नाही. वर्षभर या वृत्तादरम्यान कुठेतरी शून्य सावली दिवस असतो. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात १० मे रोजी शून्य सावलीचा अनुभव दुपारी १२.२१ ते १२.२६ या वेळेदरम्यान खगोलप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी यांनी अनुभवला.

सूर्यकिरणे विषुववृत्तावर २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी लंबरूप पडतात. या दिवशी विषुववृत्तावर शून्य सावली असते. २२ मार्च ते २१ जून या कालावधीत सूर्याचे भासमान उत्तरायण असते. त्यामुळे उत्तर गोलार्धात विषुववृत्त ते कर्कवृत्त दरम्यान दोन वेळा शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. असाच अनुभव दक्षिण गोलार्धात २४ सप्टेंबर ते २० मार्च या दक्षिणायन कालावधीत घेता येतो. सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावलीचा अनुभव मिळतो, असे पैगंबर तांबोळी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...