आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:पाण्यात बुडालेली कार तीन दिवसांनी सापडली, चालकासह पिता पुत्राचा मृत्यू

करमाळा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर शहरातील घोंगडे गल्ली परिसरातील पाणी अजूनही ओसरले नाही. - Divya Marathi
पंढरपूर शहरातील घोंगडे गल्ली परिसरातील पाणी अजूनही ओसरले नाही.

पुणे ते निंभोरे (ता. करमाळा) असा प्रवास करत असताना दोन प्रवाश्यांसह चालकाचा वाहत्या पाण्यात कार वाहून ओढ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. ही दुर्घटना जेऊर ते लव्हे रस्त्यावर दि १४ रोजी घडली आहे. शुक्रवारी पाणी कमी झाल्यानंतर कार सापडली.

या दुर्घटनेत चालक राहुल नवनाथ टोणपे (२७ रा. ता. मुळशी जिल्हा पुणे) गजानन सदाशिव वैयकर (७२) आणि सचिन गजानन वैयकर (३८ रा. वडशिवणे ता. करमाळा सध्या पिंपरी चिंचवड, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ जगन्नाथ टोणपे यांनी खबर दिली आहे.

तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. अनेक वाहने वाहून गेल्याबाबत माहिती मिळत होती. मात्र, जेऊर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने त्या परिसरात घरात तर पाणी घुसलेच पण वाहनेही पाण्यात अडकल्याचे दिसून आले. बुधवारी पुण्याहून आपल्या मूळ गावी पाहुण्यांना भेटण्यासाठी एक कारमध्ये पिता- पुत्र कारचालकासोबत करमाळ्याला आले होते. ते सुरुवातीला कंदरला आले होते. कंदरला पोहचल्यानंतर पुन्हा निंभोरेकडे जाण्याचे ठरले. राहुल हे वैयकर पिता पुत्रासह निंभोरेला निघाले असल्याबाबत राहुलने घरुन फोन आल्यावर कळवले होते. त्यानंतर रात्री उशिरा मुसळधार पाऊस सुरू असताना जेऊर ते लव्हे या रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर पाण्याचा प्रवाह वाढला होता, त्याच प्रवाहासोबत कार या तिघांना घेऊन पाण्यात बुडाली.

बातम्या आणखी आहेत...