आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिक्षक आले, आता उद्या होणार विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेच्या शैक्षणिक वर्षास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थी बुधवार, दि. १५ पासून शाळेत येणार असल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे, आकर्षक वाटावे या दृष्टीने वर्ग सजावट करण्यामध्ये मग्न होते. शाळांमध्ये फुगे व पताकांची सजावट केली आहे. वर्गात व वर्गाच्या बाहेर असलेल्या फळ्यावर शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहण्यात मग्न असताना दिसले. मनपा शिक्षण मंडळाच्या एकूण ५८ शाळा आहेत. प्रत्येक शाळांमध्ये प्रवेशोत्सव, शाळा पूर्व तयारी, दुसरा मेळाव्याचे अयाेजन करण्याचे काम सुरू आहे. मुलांचे जंगी स्वागत करावे यासाठी काही शाळांनी घोडगाडी, चारचाकी वाहनातून मुलांना आणण्याचे नियोजन केले आहे. बहुतांश शाळांनी वेळापूरच्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनी ठरवून दिलेल्या उपक्रमानुसार नियोजन केले आहे. मनपा मुलांची शाळा क्र. ५ मध्ये सोमवारी शिक्षकांनी शाळेची स्वच्छता केली तसेच पुस्तक वाटप केले जाणार असून त्यानुसार पुस्तकांवर शाळेचे शिक्के मारत असताना दिसले.

मनपा मुलांची केंद्र शाळा क्र. २ मध्ये पाहणी केली असता शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक वर्गात व वर्गाच्या बाहेर सूचना फलकांवर स्वागतपर संदेश लिहिताना दिसून आले. तसेच वर्गासमोरील स्वच्छताही केली जात होती. प्रत्येक वर्गाला तोरण बांधण्यात आलेले आहे. शाळेच्या पहिल्यादिवशी येणाऱ्या मुलांना प्रसन्न वाटले पाहिजे, तो शाळेमध्ये रमला पाहिजे या दृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती मुख्याध्यापक पवार यांनी दिली. बालभारतीकडून शहरातील सर्व शाळांना पाठ्यपुस्तके मिळाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...