आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:केमिकल घेऊन जाणाऱ्या टेम्पोने अज्ञात वाहनाला दिली जोरदार धडक, टेम्पोतील दोघे जागीच ठार

मोहोळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईहून हैदराबादकडे जाताना शेटफळ गावच्या हद्दीत झाला अपघात

मुंबईकडून हैदराबादकडे केमिकलचे डब्बे घेऊन निघालेल्या टेम्पोने रोडवर थांबलेल्या अज्ञात वाहनाला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचे वडील व अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना शनिवार (30 मे) रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ गावच्या हद्दीत घडली. प्रभाकर मोरे, उत्तम सुर्यवंशी अशी मृतांची नावे आहेत.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो क्र. एम. एच.43 /बी.पी.3508 मध्ये मुंबईहून हैदराबादकडे केमिकलचे डब्बे घेऊन चालक विनोद प्रभाकर मोरे (रा.रबाले नवी मुंबई) निघाला होता. त्याच्या समवेत त्याचे वडील प्रभाकर राघोबा मोरे (वय 50 वर्षे रा. रबाले नवी मुंबई) व उत्तम ईस्माईल सूर्यवंशी (वय 40 वर्षे रा. डिगी जि. बिदर, कर्नाटक) हे दोघे होते. शनिवारी (30 मे) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान टेम्पो शेटफळ हद्दीतील बाळासाहेब माळी यांच्या शेताजवळ आला असता टेम्पोने रोडवर थांबलेल्या अज्ञात वाहनाला जोराची धडक दिली. त्यामध्ये प्रभाकर मोरे व उत्तम सूर्यवंशी हे दोघेही जागीच मयत झाले होते तर चालक विनोद हा गंभीर जखमी होवुन आडकला होता. वरवडे टोल नाक्याच्या अपघात पथकाला यासंदर्भात माहिती मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विनोद याला बाहेर काढले व सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

अपघात एवढा भयानक होता की, क्रेनच्या साह्याने टेम्पो मध्ये अडकलेल्या मृतांना बाहेर काढावे लागले.  टॅम्पोमधील केमिकलचे डब्बे फुटून ते खाली रस्त्यावर पडले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात उग्र वास येत होता. अपघाताच्या आवाजा नंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला मात्र ते वाहन निघून गेले. याप्रकरणी वरवडे टोल नाक्याचे कर्मचारी उमेश भोसले यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे करत आहेत.

अपघातानंतर मिळालेल्या मोबाईल नंबर वरती पोलिसांनी तात्काळ संपर्क करत नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. मात्र सर्वत्र लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे नातेवाईकांना येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मृत व्यक्तींची मोहोळ पोलीस ठाण्यातील नोंद, अपघाताचे फोटो संबंधित नातेवाईकांना पाठवून त्यांना तात्काळ मोहोळ कडे येण्यासाठी मदत केली. तरीही सायंकाळी 5 वाजेपर्यंत नातेवाईक मोहोळ पर्यंत पोहोचले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...