आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:गौडगाव मंदिरात दानपेटी फोडून सव्वा लाखाची चोरी

अक्कलकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौडगाव बु. येथील श्री जागृत मारुती मंदिराच्या गेटचे कुलूप व आतील गाभाऱ्याच्या दरवाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पहाटे दानपेट्यांचे व लाेखंडी कपाटाचे आणि त्यातील स्टीलच्या लहान पेट्यातील रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी देवस्थानाचे सचिव प्रकाश मेंथे (५६) यांनी दक्षिण पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. मंदिरात सीसीटीव्ही सुरू आहे. पण पंधरा दिवसाआधीच डीडीआर बदलले आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग झाले नाही. तपासायला दिले असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याची घटना पुजाऱ्यांना निदर्शनात आली.

बातम्या आणखी आहेत...