आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेतून प्रवास करताना बहुदा मध्य रात्री किंवा पहाटेचा प्रवास अवघड वाटतो. मात्र आता चिंता करायचे कारण नाही. सोलापूरसह राज्यातील व देशातील सर्वच चालकांवर आपल्याला हवे असल्यास अर्धातास आधी वेकअप कॉल केला जाणार आहे. मात्र, याबाबत आपल्याला रेल्वे प्रशासनाला आपला पी एन आर नंबर देऊन सूचना द्यावी लागणार आहे. तुम्ही येणार नंबर दिल्यानंतर तुम्हाला कोणत्या स्थानकावर उतरायचे आणि किती वाजता उतरायचे याचीही माहिती त्यांना द्यावी लागणार आहे.
रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या 139 या क्रमांकावर जर तुम्ही रेल्वे बसल्या बसल्या फोन करून आपला पी एन आर नंबर आपले बर्थ नंबर आणि आपल्याला कुठे उतरायचे आहे. त्याचा एसटीडी कोड दिला आणि वेळ सांगितली तर तुम्हाला 139 क्रमांकाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार ठरलेल्या वेळेच्या आधी अर्धा तास आपले स्टेशन लवकरच येत आहे. आपण उठावे अशी सूचना सांगणारा फोन येणार आहे. त्यामुळे प्रवासात झोप व्यवस्थित होणार आणि अचूक ठिकाणी आपल्याला वेळेवर उठवले जाणार आहे. याकरिता आपल्याला वेगळे काही करावे लागणार नसून केवळ 139 क्रमांकावर फोन करून आपली प्रवासाची सखोल माहिती द्यावी लागणार आहे.
महिलांसाठी अधिक सोपे होईल
प्रवास करताना बहुतांश महिला कधी-कधी एकटा प्रवास करतात. त्यावेळेस असुरक्षिततेच्या कारणाने किंवा एकटेपणामुळे झोप लवकर लागत नाही किंवा प्रवासात आपले स्थानक कधी येईल या कारणाने देखील झोप येत नाही. मात्र, आता या सेवेमुळे महिलांना बिनधास्त झोपणे शक्य होणार आहे.
सूचना आल्या की लगेच यंत्रणा सुरू होईल
सोलापूर विभागाला याच्या सूचना आल्या की लगेच केंद्राने सुरू केली जाईल. 139 या एकाच बुउद्देशीय क्रमांकावरून अनेक गोष्टी होतात. त्याचीच मदत घेऊन ही सेवा देण्यात येणार आहे, असे प्रदीप हिरडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.