आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ प्रशिक्षण वर्गाचा समारोप ८ डिसेंबर रोजी होत आहे. या कार्यक्रमास श्री काशी महापाठाचा जगद्गुरु श्री मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महा स्वामी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन होणार आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षभरातील उपकरणांमधील तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग हा राष्ट्रीय स्तरावरील एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम दरवर्षी परंपरेनुसार नागपुरात होतो.
या संघ शिक्षा वर्गासाठी देशभरातून निवडक स्वयंसेवक उपस्थित असतात. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी सरसंघचालकांची होणारे मार्गदर्शन म्हणजे संघाच्या सर्वस्पर्शी भूमिकेचे आणि आगामी वाटचालीचे सुस्पष्ट विवरण असते. अशा रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मंगळवारी काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी नागपूरला रवाना झाले. यावेळी अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेचे अध्यक्ष श्रीकंठ शिवाचार्य (नागणसूर), रेणुका शिवाचार्य (मंदृप), सिद्धेश्वर वुमन पॉलीटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे मनोज हिरेहब्बु, श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव शांताय्या स्वामी, शशिकांत रामपुरे, प्राचार्य राजकुमार भोरे, प्राचार्य संगप्पाचे म्हमाणे, गुड्डापुर देवस्थानचे अध्यक्ष सद्ध्या स्वामी, सिताराम पाटील, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे संयोजक चिदानंद मुस्तारे, मल्लिनाथ पाटील, राहुल पावले, सिद्धारुढ हिटनल्ली, सागर हुमनाबादकर, कल्ला स्वामी आदी उपस्थित होते.
वीरशैव लिंगालत मंचातर्फे आठ ठिकाणी प्रक्षेपण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप ८ डिसेंबर रोजी होणार आहे. नागपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य हे मार्गदर्शन करणार आहेत. त्या कार्यक्रमाचे हिंदू वीरशैव लिंगायत मंचातर्फे सोलापूर शहरातील आठ ठिकाणी लाइव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.