आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगे बंद:पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरावरील भोंगे बंद

पंढरपुर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावरील भोंगे शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने गुरुवारी जाहीर केला आहे. समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुदलवाड यांनी सांगितले की, श्री विठ्ठल मंदिरावर असलेले भोंगे सध्या दररोज २० मिनिटे चालत आहेत.

मात्र हे भोंगा वाजवण्यासाठी मंदिराने परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हे भोंगे बंद करण्यात येत आहेत. रीतसर शासनाकडे भोंगे चालू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येईल. शासनाचे पात्र आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे भोंगे पुन्हा चालवले जातील. तोपर्यंत भोंगे बंद ठेवण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...