आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमाचा होऊ लागला अंमल:बहुतांश प्रार्थनास्थळांत भोंगे वाजले नाहीत, शहर आणि जिल्ह्यामध्ये शांततेचे वातावरण; सोन्या मारुती येथे मनसेकडून हनुमान चालिसा पठण, पोलिसांची कारवाई

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह ग्रामीण भागातही बहुतांश प्रार्थनास्थळांत भोंगे वाजलेच नाहीत. मुस्लिम समाजबांधवांकडून सामाजिक सलाेख्याचे दर्शन घडले. शहरात सोन्या मारुती मंदिरात मनसेकडून हनुमान चालिसा म्हणत आरती करण्यात आली. पोलिसांनी आज दिवसभर बंदोबस्त ठेवला होताच. शिवाय भोंगे वापरून वातावरण बिघडणार नाही, यासाठी जागृतीही केली होती. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पंढरपूर शहरात तर एकाही प्रार्थना स्थळावर भोंगा वाजला नाही. भोंगे खरेदीसाठी आता पोलिसांची परवागनी सक्तीची करण्यात आली आहे.

सोन्या मारुती मंदिरात हनुमान चालिसा आरती करताना मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी १४९ प्रमाणे नोटिसा दिल्या आहेत. शहरात जवळपास १०२ मशिदी आणि ३५९ मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वच धार्मिक स्थळांना पोलिसांनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत दोनशेहून अधिकजणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांकडून अर्ज आल्यानंतर ते अर्ज परिमंडळ उपायुक्त कार्यालय यांच्याकडे देण्यात येणार आहेत.

शासन नियमावली जाहीर केली असून, त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आणि न्यायालय आदेशान्वये डेसिबलची मर्यादा पाळत परवानगी देण्यात येणार आहे. शहरात सायंकाळी बुधवार बाजार परिसरातील प्रार्थना स्थळात अजान देण्यात आली, अशी माहिती मिळाली मात्र पोलिसांनी त्यास दुजोरा दिला नाही. सकाळी सोन्या मारुती मंदिर तर सायंकाळी बुधवार बाजार प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून नोटीसा दिल्या. भोंग्याचे साहित्यही ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

हजार पोलिस तैनात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. प्रमुख धार्मिकस्थळांसमोर पोलिसांचा चोवीस तास पहारा आहे‌,बहुतांश प्रार्थनास्थळांत भोंगे वाजले नाहीत.. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

एमआयएमचे निवेदन सोलापूर शहरातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी एमआयएम महिला आघाडीच्या वतीने पोलिस उपआयुक्त वैशाली कडुकर यांना निवेदन दिले. बुधवारी हाजीमाही चौक येथील धार्मिक स्थळासमोर झालेल्या कृतीचा उल्लेख करून भविष्यात अशी घटना घडू नये त्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवावी जेणेकरून सोलापुरातील शातंता व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच संबंधित समाजकंटकांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...