आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अर्भक टाकून दिलेल्या‎ दोघींना ताब्यात घेतले‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपूर्वी होम‎ मैदानावर सात दिवसांचे महिला‎ जातीचे अर्भक टाकून देणाऱ्या दोन‎ महिलांना पोलिसांनी ताब्यात‎ घेऊन सोडून दिले. फौजदार चावडी‎ पोलिसांनी ही कारवाई केली. ते‎ बाळ अनैतिक संबंधातून‎ जन्मल्यामुळे टाकून दिल्याचे‎ चौकशीत समोर आले.

घटनेची‎ चौकशी करून दोन्ही महिलांना‎ नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.‎ याबाबत आणखी चौकशी करण्यात‎ येणार असल्याची माहिती पोलिस‎ निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी‎ दिली. वैद्यकीय तपासणी होणार‎ आहे. सध्या ते बाळ नवरंगे‎ बालकाश्रम, पंढरपूर येथे सोडले.‎

बातम्या आणखी आहेत...