आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वराष्ट्र, स्वभाषा, स्वधर्म या त्रिसूत्रीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जे कोणी आज शिवाजी महराजांना पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे, सर्वधर्मसमभावाचे असे जोरजोरात ओरडतात, या सर्वांनी शांतपणे विचार करावा की, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा विविध शाही असलेल्या काळातील अन्यायाला विरोध करीत छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना का करावी लागली. तेव्हाची हिंदूंवरील अन्यायग्रस्त परिस्थिती हेच याचे कारण आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी केले. शिवस्मारक सभागृहात शुक्रवारी सायंकाळी शिवस्मारक मंडळाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजिली.यातील पहिले पुष्प शिरीष मोरे महाराज यांनी गुंफले. शिवरायांचे हिंदुत्व हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक तर सचिव गंगाधर गवसने यांनी प्रमुख पाहुणे व व्याख्यात्यांची ओळख करून दिली. सिद्धाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
शिवस्मारक मंडळाच्यावतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी गुंफले. यावेळी रंगनाथ बंकापूर, अॅड प्रदीपसिंह राजपूत . आजचे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता वक्ते : शिरीष मोरे महाराज विषय : शिवशाहीची परंपरा जोधपूरच्या इतिहासात ७४ आकडा निषिद्ध सम्राट अकबर ज्यांना आपण द ग्रेट सहिष्णु राजा म्हणतो, त्यांनी जोधपूरवर आक्रमण केले. जोधपूर जिंकले. त्यानंतर त्यांनी आदेश दिला की दिसतील तितक्या हिंदूंची मुंडकी छाटा. ठार मारलेल्या हिंदूंची जानवी गोळा करून त्याचे वजन केले. ते वजन होते ७४ मण, चार शेर. आजच्या भाषेत तीन हजार किलो. एका जानव्याचे वजन १५- २० ग्रॅमही नसेल. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यात तीस हजार हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचले गेले. मुंडकी भाल्यावर लावणारा शिवरायांनी विजयोत्सव थांबवला तैमूर याने उत्तरेत स्वारी केली, त्याच्या स्वागताला दीड लाख हिंदूंच्या मुंडक्याचे मिनार रचले गेले. आकड्यांमध्ये अतिशोयोक्ती असू शकेल. दीड लाख नसेल, पंधरा हजार असतील. पंधरा हजार नसतील, ५०० असतील. ५०० सोडा.. पाच जणही असू शकतील. कोणत्या प्रवृत्तीने मारले, कोणत्या विचारांनी असे मिनार उभे केले हे समजून घेतले पाहिजे. पण त्या काळात मुंडकी भाल्यावर लावून विजयोत्सव साजरे व्हायचे. शिवरायांनी हे थांबवले. शिवस्मारक मंडळाच्यावतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी गुंफले. यावेळी रंगनाथ बंकापूर, अॅड प्रदीपसिंह राजपूत . मुंडकी भाल्यावर लावणारा शिवरायांनी विजयोत्सव थांबवला तैमूर याने उत्तरेत स्वारी केली, त्याच्या स्वागताला दीड लाख हिंदूंच्या मुंडक्याचे मिनार रचले गेले. आकड्यांमध्ये अतिशोयोक्ती असू शकेल. दीड लाख नसेल, पंधरा हजार असतील. पंधरा हजार नसतील, ५०० असतील. ५०० सोडा.. पाच जणही असू शकतील. कोणत्या प्रवृत्तीने मारले, कोणत्या विचारांनी असे मिनार उभे केले हे समजून घेतले पाहिजे. पण त्या काळात मुंडकी भाल्यावर लावून विजयोत्सव साजरे व्हायचे. शिवरायांनी हे थांबवले. जोधपूरच्या इतिहासात ७४ आकडा निषिद्ध सम्राट अकबर ज्यांना आपण द ग्रेट सहिष्णु राजा म्हणतो, त्यांनी जोधपूरवर आक्रमण केले. जोधपूर जिंकले. त्यानंतर त्यांनी आदेश दिला की दिसतील तितक्या हिंदूंची मुंडकी छाटा. ठार मारलेल्या हिंदूंची जानवी गोळा करून त्याचे वजन केले. ते वजन होते ७४ मण, चार शेर. आजच्या भाषेत तीन हजार किलो. एका जानव्याचे वजन १५- २० ग्रॅमही नसेल. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यात तीस हजार हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचले गेले. आजचे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता वक्ते : शिरीष मोरे महाराज विषय : शिवशाहीची परंपरा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.