आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिका निवडणुक:प्रभाग निहाय मतदार यादी 7 जुलैला तर प्रारुप यादी 17 जूनला होणार प्रसिद्ध

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नंतर प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याचे काम निवडणुक आयोगाने सुरु केले आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी निवडणुक आयोग करत असल्याचे स्पष्ट होते. 17 जूनपर्यंत प्रभाग निहाय मतदार यादी करुन प्रारुप यादीची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्यावर सूचना व हरकती घेऊन अंतिम यादी 7 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

ओबीसी मतदार यादी करण्यासाठी 750 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले. पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 9.51 लाख आहे तर 31 मे 2022 पर्यंत नोंद केलेल्या मतदारांची नावे पालिका निवडणुकीसाठी पात्र असतील.

4 जानेवारी 2022 पर्यंत नोंद केलेले 8.11 लाख मतदार असून, यात पुन्हा वाढ होणार आहे. यातून प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी पालिका आयुक्तांना निवडणुक आयोगाकडून आदेश आला आहे. प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी 17 जूनला प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर सूचना व हरकती २५ जून पर्यंत घेता येतील. त्यांची खात्री करुन 7 जुलै रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अधिकृत 9.51 लोकसंख्या असलेल्या शहरात अधिकृतपणे 8.11 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...