आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ६६ शिक्षकांचा समावेश:१८०० शिक्षकांचा स्वजिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटानंतर शिक्षकांना स्वजिल्ह्यात बदलून जाण्याची संधी मिळणार आहे. पाचव्या टप्प्यात ३ हजार ९४३ बदल्या होणार आहेत. अशा आजपर्यंत एकूण १९ हजार ३९३ बदल्या झाल्या आहेत. यासाठी शिक्षक संघटना पाठपुरावा करत होत्या.

बदलीची ऑनलाइन प्रक्रिया होत आली आहे. सोमवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बदली यादी प्रकाशित होणार आहे. कार्यमुक्त कधी करावयाचे याबाबत ग्रामविकास मंत्री निर्णय घेणार असल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. पारदर्शी बदली प्रक्रियेसाठी शिक्षक सहकार संघटनेने २०१५ पासून लढा देत आहे. जिल्हांतर्गत बदल्यासुद्धा पारदर्शक व एका क्लिकवर झाल्या, असेही त्यांनी सांगितले. शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, महिला राज्यध्यक्ष शुभांगी चौधरी, सचिव नीलेश देशमुख, राज्य कार्याध्यक्ष दीपक परचंडे, प्रसिध्दी प्रमुख गजानन देवकत्ते आदींंनी प्रयत्न केले.

पाचव्या टप्प्यातील जिल्हावार शिक्षक
अहमदनगर ८८, अकोला १७, अमरावती ४०, औरंगाबाद १७०, बीड १०२, भंडारा १९, बुलडाणा ७२, चंद्रपूर १०२, धुळे ७७, गडचिरोली ११९, गोंदिया ६४, हिंगोली ९१, जळगाव ११५, जालना १८९, कोल्हापूर ६४, लातूर १८, नागपूर ११, नांदेड ७४, नंदुरबार १३०, नाशिक १२९, उस्मानाबाद ३५, पालघर ४७८, परभणी ८४, पुणे ५५, रायगड २४८, रत्नागिरी ४०५, सांगली ९२, सातारा ६६, सिंधुदुर्ग ३६६, सोलापूर ६६, ठाणे ६५, वर्धा ३९, वाशिम ६०, यवतमाळ १९२. एकूण - ३९४३.

बातम्या आणखी आहेत...