आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील जड वाहतूक वळवण्यास‎ मदत:54 मीटर रस्त्यावरील‎ रेल्वे पुलाचे काम सुरू‎

सोलापूर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुना पुणे नाका ते हत्तुर बायपास‎ दरम्यान ५४ मीटर रुंदीचा रस्ता‎ करण्यात येत आहे. या मार्गावरील‎ अवंती नगर येथील रेल्वे पुलाचे‎ थांबलेले काम रेल्वे विभागाने पुन्हा‎ सुरू केले आहे. काम पूर्ण होताच‎ रेल्वचे शटडाऊन घेऊन पुलाचे‎ मुख्य काम करण्यात येईल. यामुळे‎ शहरातील जड वाहतूक वळवण्यास‎ मदत होणार आहे. तसेच, मरिआई‎ चौकाजवळील रेल्वे पुलावरून बंद‎ केलेली जड वाहतूकही येथून‎ वळवण्यास मदत होणार आहे.‎ ५४ मीटर रस्त्याचे काम अवंती‎ नगर रेल्वे पुलासह पूर्ण झाल्यावर‎ शिवाजी चौकातील जड‎ वाहतुकीसह वाहतुकीची कोंडी‎ कमी होणार आहे.

भूसंपादन आणि‎ रेल्वे पुलाचे काम रखडल्याने या‎ रस्त्याचे काम बंद होते. दरम्यान,‎ सोलापूर महापालिकेने रेल्वे‎ विभागाकडे १७ कोटी रुपये भरले‎ होते. तरीही काम बंद असल्यामुळे‎ पालिका प्रशासक शीतल तेली यांनी‎ रेल्वे विभागास पत्र लिहले. त्यामुळे‎ रेल्वे विभागाने पुलाचे काम सुरू‎ केले आहे. त्यासाठी स्टीलची‎ आवक केली आहे. आता लवकरच‎ रेल्वे शटडाऊन घेऊन पुलाचे मुख्य‎ काम पूर्ण करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...