आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजमाध्यमे दाेन गाेष्टी सांगू शकतील, परंतु सखाेल आणि सत्य माहिती देणार नाहीत. जिज्ञासा निर्माण करत, संवेदशील मनाला साद घालण्याचे काम मुद्रित माध्यमेच करू शकतात, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मॅनेजमेंट गुरू एन. रघुरामन यांनी शनिवारी सोलापूर येथे सांगितले.
दैनिक दिव्य मराठी व साेलापूर अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असाेसिएशनच्या (सावा) वतीने आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. ‘सध्याच्या डिजिटल युगात वृत्तपत्रातील जाहिरातींचे महत्त्व’ या विषयावर बाेलताना त्यांनी वर्तमान मार्केटिंग फंडा सांगितला. देश-विदेशातील किस्से सांगून मुद्रित, लिखित गाेष्टीच कशा कायम स्मरणात असतात हेही पटवून दिले. समाजमाध्यमांतील गाेष्टी किती लाेकांच्या स्मरणात असतात? त्याची विश्वासार्हता काय असते? असे प्रश्न उपस्थित केले. डाॅ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी उद्याेग, व्यापार आणि जाहिरात क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित हाेती. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
डिजिटलकडे तरुणाईचाच आेढा, निवड कुठाय ? आजची पिढी जुन्या पिढीपेक्षा चारपट हुशार आहे. त्याच्या हातात डिजिटल माध्यमे आणि बहुपर्याय आहेत. परंतु त्याची निवड स्थिर नाही. ताे अनेक गाेष्टींना पसंती देताे आणि नेमक्या निवडीत फसून बसताे. त्याच्या माेबाइलमध्ये पर्यायांनी इतकी गर्दी केली की काय ठेवू आणि काय काढू याच गाेंधळात पडलेला असताे. ज्येष्ठांचे तसे नाही. वर्तमानपत्रांत छापून येणाऱ्या गाेष्टींवर त्यांचा दृढ विश्वास आहे. त्या आधारे त्यांची निवड पक्की आहे. त्यामुळे ते कधीच डळमळीत निर्णय घेऊ शकत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.