आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बहिणीला शाळेला सोडायला गेलेली तरुणी परतली नाही

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणीला शाळेला सोडायला गेलेली तरुणी पुन्हा घरी आलीच नाही. याबाबत ती हरवल्याची तक्रार पालकांनी फौजदार चावडी पोलिसात दिली आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौक (भाजी मंडई परिसरात) राहणारी एक अठरा वर्षीय तरुणी १५ डिसेंबर रोजी कोणालाही न सांगता निघून गेली आहे. सकाळी घरात बहिणीला सरस्वती चौकातील एका शाळेमध्ये सोडून येते म्हणून गेली. ती‌ पुन्हा आलीच नाही.

दुसऱ्या घटनेत व्यंकटेश चिरंजीवी किजकोटी (वय ३६, रा. माधवनगर, सोलापूर) हा तरुण १७ डिसेंबर रोजी घरातून निघून गेला आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. यामुळे तो घरातून निघून गेला असावा अशी फिर्याद पोलिसांत नातेवाईकांनी नोंदवली आहे. संबंधित व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी सदर बझार पोलिसात माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...