आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मोहोळमध्ये चोरी; 6 लाख लंपास

मोहोळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह, रोख रक्कम व पिस्तुलाची २८ जिवंत काडतुसे असा ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरी घडली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ- कुरूल रस्त्यावरील बागवाननगर परिसरात बांधकाम व्यावसायिक इलियास खाजाँबक्ष शेख यांचे घर आहे. तेथे आई-वडील राहतात. मुलांच्या शाळेनिमित्त ते सोलापुरात राहतात.

दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पुणे येथे कामानिमित्त त्यांचे आई-वडील घराला कुलूप लावून गेले होते. याचीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याच्या पाटल्या, सोन्याची चैन व चांदीचे पैंजण, परवानाधारक पिस्तुलाचे २८ काडतुसे असा एकूण ३ लाख १८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला.

शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घरकामानिमित्त असलेल्या महिलेने शेख यांच्या आई वडिलांना फोन करून दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर इलियास शेख यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून सोन्याचे चांदीचे दागिने व एक लोखंडी डिजिटल लॉकर चोरट्याने पळवून नेल्याचे निदर्शनास आले.

इलियास शेख यांनी झालेल्या चोरीबाबत शेजाऱ्यांना सांगितले असता त्यांच्या शेजारचे अफसर पैगंबर सय्यद यांचेही बंद घर फोडून १ लाख ६५ हजारांची रोख रक्कम व १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समजले.

पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी बाहेरगावी जाताना
आपल्या जवळील असलेल्या मौल्यवान वस्तू ,पैसे घर बंद करताना त्यामध्ये ठेवू नयेत.पोलीस ठाण्याच्या वतीने शहराच्या विविध भागात रात्रगस्त सुरूच असून काही संशयास्पद हालचालीत दिसल्यास नागरिकांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...