आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पनाश अपार्टमेंटमध्ये दीड लाखांची चोरी

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर रस्त्यावरील पनाश अपार्टमेंटमधील ज्येष्ठ नागरिकाच्या बंद घराचे कुलूप उचकटून लोखंडी कपाटातील १ लाख ४४ हजार ५०० रुपयांचे दागिने पळवण्यात आले. ही घटना रविवार (दि. २०) घडली. याप्रकरणी मोहन नामदेव नरुटे (वय ७१) यांनी विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. श्री. नरुटे हे शेताला गेले होते.

घरात कुणी नसल्याची संधी साधून बंद दाराचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी पळविला. तसेच, नरुटे यांच्या शेजारील सादीक शेख यांच्या घरातून घड्याळही पळविले.

बातम्या आणखी आहेत...