आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र उत्सव:ब्रतुकम्माचा ठेका अन् पैठणींची लयलूट

साेलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ब्रतुकम्मा’ म्हणजे मराठीतला भाेंडला. पूर्वभागातील महिलांना नवरात्राेत्सवातील सांस्कृतिक मेजवानी. या मेजवानीत यंदा पैठणी साड्यांची लयलूट झाली. सेवाभावी संस्थांनी त्याच्या स्पर्धा घेऊन बक्षिसे दिली. उत्कृष्ट सजावट, वेशभूषा या निकषांवरच्या या स्पर्धेत पूर्व भागातील असंख्य महिला सहभागी झाल्या हाेत्या. महात्मा मित्र मंडळ अशाेक चाैकातील महात्मा मित्र मंडळाच्या स्पर्धेत नागमणी कमटम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. लक्ष्मीबाई गंगूल (द्वितीय), लता कमटम (तृतीय) आणि उकृष्ट वेशभूषामध्ये गौरी कमटम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्यांना पैठणी साड्या बक्षिस म्हणून देण्यात आले. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे माजी स्वागताध्यक्ष भूपती कमटम, श्रीनिवास गाली, अनिल मंगलपल्ली, चंद्रमोगली कमटम, श्रीनिवास कमटम, राजमहिंद्र कमटम, लक्ष्मीनारायण कमटम आदी या वेळी उपस्थित हाेते.

विणकर गृहउद्योग संस्था विणकर नगरातील नागलक्ष्मी मंदिर परिसरात झालेल्या स्पर्धेत ब्रतुकम्मा आणि गरबा उत्सव झाला. विजेत्या स्पर्धकांना माजी महापौर श्रीकांचना यन्नम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे आणि माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली यांच्या हस्ते गाैरवण्यात आले. कवयित्री रेणुका बुधारम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण भीमनाथ, संयोजक शशिकांत केंची, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, सत्यनारायण अडगटला, बाळू गंजी, गणेश बुधारम, परीक्षक म्हणून सपना वंगा यांनी काम पाहिले.

जय हनुमान मंडळ भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील जय हनुमान शक्तिसेवा मंडळाच्या वतीने ब्रतुकम्मा सजावट स्पर्धा झाली. फुलांची सजावट करून महिला या स्पर्धेत उतरल्या हाेत्या. त्यांचा पारंपरिक पेहराव हाेता. तेलुगु लाेकगीतावर त्यांनी फेर धरला. विजेत्या महिलांना पैठणी साड्या देण्यात आल्या. दत्तात्रय बडगू यांनी कार्यक्रमाचे संयाेजन केले हाेते. डाॅ. प्रिया महिंद्रकर, डाॅ. सुवर्ण जाधव, स्वाती बडगू यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. रुपा कटकम यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...