आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशनच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होण्याऐवजी त्या बाबतच्या तक्रारीच वाढल्या आहेत. त्यासाठी वापरण्यात येणारे पाइप गुणवत्तापूर्ण नसणे, निविदा प्रक्रियेत ठेकेदारांना झुकते माप देण्यात आल्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कानउघाडणी केली. मात्र या पूर्वीच चौकशी झाली, समितीत नेमली पण कारवाई काही होईना. त्यामुळे या कानउघाडणीला काहीच अर्थ नसल्याची चर्चा आहे.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची पडताळणी करा, पुढील बैठकीत त्यासंदर्भात सविस्तर आढावा घेणार असल्याचे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा रविवारी (दि. ६) लक्ष्मी विष्णू मिल कंपाउंड मधील आत्मा व कृषी विभाग अंतर्गत कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी घेण्यात आला. या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शीतल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत जल-जीवन मिशनच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी सादर केला.
लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची पडताळणी करण्याचे निर्देश आमदारांनी केल्या तक्रारी सुभाष देशमुख : निविदा प्रक्रिया राबवताना अनियमितता झाली आहे. काम न करणारे, तक्रारी असलेल्या ठेकेदारांच्या निविदा सोईस्करपणे मंजूर झाल्या आहेत. संजय शिंदे : मागील कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर करावी करीत पुन्हा त्यांना काम देऊ नये. सचिन कल्याणशेट्टी : जिल्ह्यात योजनांची काम राबवताना खूप घाई करण्यात असल्याने अनियमिततेचे प्रकार घडले आहेत. दर्जा, गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाला आहे. समाधान आवताडे : दोनपेक्षा जास्त काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना पुढील निविदा प्रक्रियेत अपात्र करा. काळ्या यादीत टाकलेले ठेकेदार यांची देखील माहिती सादर करा.
कारवाईबाबत शासन स्तरावरच टोलवाटोलवी सुरू जलजीवन मिशनच्या कामांबाबतच्या तक्रारींचा अहवाल स्वतंत्र समितीने सादर केला पण त्यामध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यातील नऊ गावांतील जलजीवनमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी शेकापने केल्या. त्यासंदर्भातील चौकशी समितीने दोन मोठ्या त्रुटी समोर आणल्या. त्याबाबतही बोटचेपी भूमिका प्रशासनाने घेतील आहे. खाते प्रमुखांच्या कार्यपद्धती बाबतच्या तक्रारी, चौकशी अहवाल सर्वांपुढे खुला करून त्याबाबत दोषींवर कारवाई करण्याबाबत शासन-प्रशासन स्तरावरच टोलवाटोलवी सुरू आहे.
त्रयस्थ संस्थेकडून तपासणी, गुणवत्ता आणणार ^मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी जल-जीवन मिशन च्या कामांची माहिती दिली. ‘८६२ गावांसाठी ८५५ योजना आहेत. कामाचा दर्जा चांगला ठेवणेसाठी त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद स्तरावर चांगले पाइप पुरवठा करणाऱ्या कंपनीची यादी तयार करण्यात येत असून गुणवत्तापूर्ण कामे होतील.'' संदीप कोहीनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.