आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी २६ दिवसांवर:महसूल, पोलिस आणि पालिका प्रशासनात समन्वयाची आहे गरज; अर्धवट कामे मार्गी लावण्याचे आव्हान

पंढरपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा २६ दिवसांवर येऊन ठेपला आहे, मात्र अजूनही पंढरपूर नगरपालिकेला जाहीर केलेले मागील २ वर्षातील साडे तीन कोटी रुपयांचे यात्रा अनुदान थकीत आहे. वाढलेला खर्च लक्षात घेऊन यंदा ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान वाढवून द्यावे अशी मागणी ग्रामपंचायतींकडून होत आहे. हे अनुदान कधी मिळणार याकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.

अनुदान मिळाले तर होणार कामे
दोन वर्षे यात्रा झालेली नाही, त्यामुळे पाणी पुरवठा, स्वच्छता या कामांवरील खर्च वाढला आहे. सध्या सर्व कामे ग्राम निधीतून, उधारीवर करून आहोत. यात्रा अनुदान मिळेल अशी अपेक्षा आहे, ते कधी मिळणार, किती मिळणार हे अद्याप तरी समजलेले नाही. लवकर मिळावे अशी मागणी आहे.''
कविता पोरे, सरपंच वाखरी, ता. पंढरपूर

अनुदानाची मागणी केलेली आहे
पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीना वेळेवर अनुदान मिळावे अशी मागणी जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. दोन वर्षे यात्रा झालेली नसल्याने यंदा पाणी पुरवठा, स्वच्छता यावरील खर्च वाढलेला आहे. हे लक्षात घेऊन मुक्कामाच्या ग्रामपंचायतींना १० लाख, दुपारचा विसावा असलेल्या ग्रामपंचायतींना ५ लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी केलेली आहे.''
प्रशांत काळे, गटविकास अधिकारी, पंढरपूर

बातम्या आणखी आहेत...