आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत शैक्षणिक साहित्य वाटप:शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही; चिकाटी, जिद्द आणि मेहनत या बळावर तुम्ही काहीही बनू शकता - भांबुरे

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ते प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवदासमय मंगलकार्यालय शेळगी येथे वंचित मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त फौजदार रमेश मोहिते, गणेश सूत्रावे पत्रकार अश्विनी तडवळकर आणि प्रमिला उबाळे हे उपस्थित होते.

यावेळी भांबुरे यांनी गरिबी ही आपल्याला काहीही होण्यापासून थांबवू शकत नाही. चिकाटी जिद्द आणि मेहनत या बळावर तुम्ही काहीही बनू शकता. त्याला समाजातील अनेक लोक मदत करतात. ती मदत घेऊन आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि काही तरी करून दाखवावे, असाही सल्ला दिला. यावेळी मोहिते यांनी मुलांना शिक्षण घेऊन मोठे व्हा आणि उत्तम माणूस नागरिक बना असा संदेश दिला. यावेळी प्रमिला उबाळे यांनी संस्थेची माहिती लिहून संस्थेचे उद्देश स्पष्ट केले.या कार्यक्रमाकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली असून मुलांच्या साहित्यासाठी संस्थेच्या संचालिका उबाळे आणि समाजातील दानशूर व्यक्ती व सर्वांनी मिळून हातभार लावला.

बातम्या आणखी आहेत...