आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापुरातील प्रिसिजन काॅलनी येथे ड्रेनेज समस्या असून, तेथील सेफ्टी टँक ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर मैलामिश्रीत पाणी येत आहे. यामुळे शेजारी कुटुंबात वाद होत आहेत तेथे ड्रेनेजलाइन टाकावी. तसेच, काेरे नगरसाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात अडचण येईल तेथे रस्ता करावा. पाण्याची टाकी ते बाॅम्बे पार्क रस्ता खराब झाला असून, तो त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी त्या परिसरातील महिलांनी महापालिका प्रशासक शीतल तेली-उगले यांच्याकडे केली. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी तेथील समस्या सोडवण्याची मागणी केली.
प्रिसिजन काॅलनी ड्रेनेज नसल्याने सेफ्टी टँकवर अवलंबून राहावे लागते. रस्त्यावर पाणी वाहतेय. त्याचे चेंबर उघडे राहत असून, त्यात लहान मुले पडण्याचा धोका आहे. नागरी काम त्वरित करावे, अशी अपेक्षा अंजली राऊत, दीपिका होळे, अर्चना धामणसकर, ललिता धवन, अनिता रेवे, मगर, अचनाळे, परदेशी, सिध्दप्पा रेवे यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.